शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

राफेलनंतर रस्त्यांचे थ्रीडी मॅपिंग दसॉल्वकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 00:45 IST

राफेल विमान खरेदीतील कथित घोटाळ्यावरून गाजत असलेल्या दसॉल्व या कंपनीने पुण्यातील रस्त्यांचे थ्री डी मॅपिंग करण्याची तयारी दर्शवली आहे.

पुणे : राफेल विमान खरेदीतील कथित घोटाळ्यावरून गाजत असलेल्या दसॉल्व या कंपनीने पुण्यातील रस्त्यांचे थ्री डी मॅपिंग करण्याची तयारी दर्शवली आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने या कामाचा प्रस्ताव काही कंपन्यांबरोबर प्राथमिक चर्चा करून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर आणला होता. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाची माहिती सभागृहाला दिली. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने मतदानाने हा विषय मंजूर करून घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला, तर काँग्रेस तटस्थ राहिली. शिवसेनेत या विषयावरून दुफळी झाली.या विषयाबरोबरच स्मार्ट एलिमेंट्स हा विषयही याच पद्धतीने मंजूर करण्यात आला. हे दोन्ही विषय स्मार्ट सिटी कंपनी त्यांच्या विशेष कार्यक्षेत्रात म्हणजे औंध-बाणेर-बालेवाडीमध्ये राबवणार आहे. मात्र ते पुणे शहरातही राबवावेत, असे संचालक मंडळाने सुचवल्यावरून कंपनीने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवले होते. त्यावेळी माहिती देताना कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी काही परदेशी कंपन्यांबरोबरच दसॉल्व या कंपनीनेही हे काम करण्याची तयारी दर्शवली असल्याचे सभागृहाला सांगितले. त्यांच्याशी कामाच्या संबंधाने प्राथमिक चर्चा झाली असे ते म्हणाले. काँग्रेसचे अरविंद शिंदे म्हणाले, की याआधी कंपनीने त्यांच्या विशेष क्षेत्रांसह अनेक उपक्रम शहरातही राबवले. त्यावेळी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची परवानगी घेतली नाही. मग आताच ते का आणले? कसली अडचण झाली? राष्ट्रवादीचे दिलीप बराटे, सुभाष जगताप, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांनी विषयांना विरोध केला.बराटे म्हणाले, की या विषयाचे डॉकेट (माहिती) विषयाला जोडलेले नाही. तर सुतार यांनी याचा खर्च कोण करणार? अशी विचारणा केली.विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, की प्रस्ताव प्रशासनाने मांडायचा तर तो नगरसेवकांच्या माध्यमातून का मांडला जातो आहे? शहरात याआधी कामे केलीत त्याची परवानगी घेतली होती का? सभागृहनेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, की पुण्यात अशी वेगळ्या प्रकारची कामे होत आहेत, त्यात मोडता घालू नये. महापालिकेला यात कोणताही खर्च करावा लागणार नाही. अखेर मतदानाने विषय मंजूर झाले.भाजपाने विषयाच्या बाजूने मतदान केले. काँग्रेस तटस्थ राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला. शिवसेनेत या विषयांवरून दोन गट पडले. विशाल धनवडे व पृथ्वीराज सुतार यांनी विरोध केला. गटनेते संजय भोसले, पल्लवी जावळे, संगीता ठोसर यांनी भाजपाला साह्य केले. राष्ट्रवादीनेच स्मार्ट सिटी त्यांच्या सत्तेच्या काळात मंजूर केली व आता तेच या दोन्ही विषयांना विरोध करत आहे अशी टीका काँग्रेसने केली.भाजपाच्या गोपाळ चिंतल यांनी प्रस्तावाची सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी केली. त्याचा उल्लेख करून शिंदे म्हणाले, राफेल प्रकरणातील कंपनीने तयारी दर्शवलेल्या कामाची माहिती भाजपाच्या चिंतल यांनी मागितली हे भारीच झाले.>सर्व रस्त्यांचे एरियल मॅपिंग होणारया कामात शहरातील सर्व रस्त्यांचे एरियल मॅपिंग करण्यात येणार आहे. ड्रोन कॅमेºयाने वरून हे चित्रिकरण करण्यात येईल. त्यामुळे रस्त्याची लांबी, रूंदी त्यावरची दुकाने, अतिक्रमणे,याबरोबरच अन्य अनेक गोष्टींची माहिती केवळ एका क्लिकवर मिळणार आहे. योजना राबवण्यासाठी, कामे करण्यासाठी, म्हणून या सर्व गोष्टींचा उपयोग प्रशासनाला होत असल्याने जगभरात सर्वत्र रस्त्यांचे अशा पद्धतीने मॅपिंग केले जात असल्याचे जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे