शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यात 24 तासांत तब्बल 375 मिमी पाऊस; जनजीवन विस्कळीत   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 09:46 IST

लोणावळेकर झोपेत असताना मुसळधार पावसाने लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे.

लोणावळा - लोणावळेकर झोपेत असताना मुसळधार पावसाने लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील 24 तासात शहरात तब्बल 375 मिमी पाऊस झाला असून यापैकी 300 मिमी पाऊस हा शुक्रवारची रात्र ते शनिवारचे पहाटे दरम्यान पडला आहे.   मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजिवन विस्कळीत झाले आहे. नांगरगाव येथिल जाधव काॅलनी व विघ्नहर सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. वलवण नांगरगाव रस्ता, नांगरगाव ते भांगरवाडी रस्ता, मावळा पुतळा चौक, ट्रायोज माॅल समोरील रस्ता, बापदेव रोड, नारायणी धाम रस्ता पाण्याखाली गेला आहे. बद्रीविशाल सोसायटीला देखिल पाण्याचा विळखा पडला आहे. शुक्रवार रात्रभर पावसाने लोणावळा व परिसरात झोडपून काढल्याने ग्रामीण भागातून वाहणार्‍या इंद्र‍यणी नदीला डोंगरगाव, सदापुर, कार्ला, मळवली परिसरात पुर आला असून पुराचे पाणी सर्वत्र पसरले आहे. मळवली भागातील अनेक सोसायट्याच्या परिसरात पाणी साचल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे. पावसाची संततधार कायम असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 भुशी धरणावर जाण्याचा मोह टाळा 

लोणावळ्यातील प्रसिध्द भुशी धरणाच्या सांडव्यावरुन प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने धरणाच्या पायर्‍यावर जाणे धोकादायक झाले आहे. लोणावळ्यात येणार्‍या पर्यटकांनी या धोक्याची नोंद घेत धरणाच्या पायर्‍यांवर जाणे टाळावे. शुक्रवारी पायर्‍यावर आडकलेल्या सहा पर्यटक‍ांनी स्थानिक दुकानदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले.

 धबधब्याखाली जाऊ नका 

लोणावळा शहरात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्यांमधून वेगाने पाणी वाहत आहे. ह्या पाण्यात जाणे धोकादायक असल्याने पर्यटक‍ांनी धबधब्यांची खाली जाणे टाळावे.

टॅग्स :Rainपाऊसlonavalaलोणावळा