शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

३७२ कोटी थकला मिळकतकर; १ हजार ८१६ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 03:10 IST

मार्चअखेर जवळ आल्याने महापालिकेच्या मिळकतकर विभागाने जास्तीतजास्त कर वसूल करण्यासाठी कंबर कसली आहे. परंतु शहरातील तब्बल १ लाख ६६ हजार ६३५ पुणेकरांनी गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ मिळकत करच भरला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे : मार्चअखेर जवळ आल्याने महापालिकेच्या मिळकतकर विभागाने जास्तीतजास्त कर वसूल करण्यासाठी कंबर कसली आहे. परंतु शहरातील तब्बल १ लाख ६६ हजार ६३५ पुणेकरांनी गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ मिळकत करच भरला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या मिळकतकरदात्यांकडे तब्बल३७२ कोटी ६४ लाख रुपयांची थकबाकी असून, दंडापोटी तब्बल ४ कोटी ६६ लाख रुपये वसूल करण्यात येणार आहेत.महापालिकेच्या वतीने चालू वर्षासाठी मिळकतकरातून तब्बल १ हजार ८१६ कोटी रुपयांचा कर वसूल करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मार्चअखेर जवळ आल्याने जास्तीत जास्त कर वसूल करण्यासाठी मिळकती जप्त करणे, भरारी पथकांची नियुक्ती, थकबाकीदारांच्या घरांसमोर बॅण्ड वाजवणे, नोटीस देणे आदी कडक कारवाई सुरु आहे. तरीदेखील किमान एक हजार कोटींचा टप्पा ओलांडताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहे. असे असताना शहरातील लाखो मिळकतदार करच भरत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.महापालिकेचे सदस्य आनंद रिठे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मिळकतकर विभागाने वरील माहिती दिली आहे. यामध्ये शहरामध्ये २५ हजारांपेक्षा कमी वार्षिककरपात्र रक्कम असलेल्या ७ लाख ४ हजार ५७८ मिळकती असून,यापैकी तब्बल १ लाख ६६ हजार६३५ मिळकतदारांनी गेल्या ३ वर्षांहून जास्त काळ मिळकतकरच भरला नसल्याचे सांगितले आहे. या मिळकतदारांकडे ३७२ कोटी ६४ लाख १२ हजार ४४७ रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ४ कोटी ६६ लाख रुपयांचा दंड करण्यात आला असल्याचे मिळकतकर विभागाने स्पष्ट केले आहे.या थकबाकीदारांकडून जास्तीत जास्त कर वसलू करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु न्यायालयीन प्रकरणे, दुबार मिळकती यामुळे अडचणी येत आहेत.अंदाजपत्रकात प्रथमच १७०० कोटींची तूटमिळकतकरातून महापालिकेला सन २०१७-१८ मध्ये तब्बल १ हजार ८१६ कोटींचा कर मिळेल असे गृहीत धरण्यात आले. परंतु पहिल्या सहा महिन्यांत ५०० ते ५५० कोटी रुपयेदेखील वसूल झाले नाहीत.यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये यंदा प्रथमच १७०० कोटी रुपयांची तूट निर्माण झाली. यामुळे प्रशासनाचे जास्तीतजास्त कर वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु लाखो पुणेकर करच भरत नसतील तर करवसुलीचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार, हा मोठा प्रश्नच आहे.

टॅग्स :Puneपुणे