पुणे : भूमिअभिलेख विभागात भूकरमापकांची सरळसेवेने ९०३ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑनलाइन ३७ हजार १५२ अर्ज दाखल झाले आहेत. या पदासाठी १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार आहेत.
राज्य सरकारने भूमिअभिलेख विभागात दोन वर्षांपूर्वी खासगी एजन्सीद्वारे सुमारे बाराशेहून अधिक पदांची भरती परीक्षेच्या माध्यमातून केली होती. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्यात आली होती. त्यातील काही उमेदवार संबधित ठिकाणी रुजू झाले होते. मात्र, त्यानंतर सुमारे सहाशेहून अधिक उमेदवारांनी रुजू झाल्यानंतर काही महिन्यांतच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकांची अनेक पदे पुन्हा रिक्त झाली. परिणामी मोजणी प्रकरणे प्रलंबित राहू लागली.ही बाब लक्षात घेऊन भूमिअभिलेख विभागाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी भूकरमापकांच्या पदभरतीसाठी राज्य सरकारकडे पुन्हा प्रस्ताव पाठविला होता. त्यास मान्यता मिळाल्यानंतर एका खासगी एजन्सीमार्फत भरतीप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली. हे अर्ज उमेदवारांकडून १ ते २४ ऑक्टोबर यादरम्यान ऑनलाइन मागविण्यात आले होते. अर्जांची छाननी झाल्यानंतर १३ आणि १४ नोव्हेबर रोजी परीक्षा होणार आहे.
विभाग--पदांची संख्या -- प्राप्त अर्ज
पुणे ---- ८३--३९०७कोकण -- २५९--९७९४
नाशिक ----१२४-- ५३२७संभाजीनगर-- २१०---९९४२
अमरावती ---११७---४३४७नागपूर ---११०--३८३५
एकूण --९०३--३७१५२
Web Summary : Land Records Department to fill 903 surveyor posts. Over 37,000 applications received. Exams scheduled for November 13th and 14th. Vacancies arose after previous hires resigned, causing delays in land measurement cases. Recruitment drive aims to address backlog.
Web Summary : भूमि अभिलेख विभाग 903 सर्वेक्षक पदों को भरेगा। 37,000 से अधिक आवेदन प्राप्त हुए। परीक्षाएँ 13 और 14 नवंबर को निर्धारित हैं। पहले नियुक्तियों के इस्तीफे के बाद रिक्तियां हुईं, जिससे भूमि माप के मामलों में देरी हुई। भर्ती अभियान का उद्देश्य बैकलॉग को दूर करना है।