शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

बेशिस्तांना ३७ कोटी दंड, वाहतूक पोलिसांकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:45 IST

पुणे शहर वाहतूकदृष्ट्या ‘बेशिस्ती’चे शहर म्हणून गणले जाऊ लागले असून गेल्या वर्षभरात बेशिस्त वाहनचालकांनी तब्बल ३७ कोटींचा दंड भरला आहे. वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाºया दंड वसुलीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक नियमभंग करणाºया वाहनचालकांची संख्या पोलिसांच्या कारवाईपेक्षा अधिक गतीने वाढत चालली आहे.

- लक्ष्मण मोरेपुणे : पुणे शहर वाहतूकदृष्ट्या ‘बेशिस्ती’चे शहर म्हणून गणले जाऊ लागले असून गेल्या वर्षभरात बेशिस्त वाहनचालकांनी तब्बल ३७ कोटींचा दंड भरला आहे. वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाºया दंड वसुलीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक नियमभंग करणाºया वाहनचालकांची संख्या पोलिसांच्या कारवाईपेक्षा अधिक गतीने वाढत चालली आहे. वाहतूक शाखेने सुरू केलेल्या आॅनलाईन दंड वसुली आणि सीसीटीव्ही कारवाईमधून तब्बल ३२ लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी आणि आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडत चालली असून पुणेकरांमध्ये अद्यापही वाहतूक निरक्षरता मोठ्या प्रमाणावर असल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाहतूक नियमभंगाच्या पावत्या फाडण्याचा विक्रम पुणेकरांनी यंदाही कायम ठेवला आहे. सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेले पुणे शहर राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत वाहतूक नियमभंगामध्येही अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘जिथे कमी तिथे आम्ही’ असे अभिमानाने सांगणारे पुणेकरांकडून वाहतूक नियमभंगासाठी ३७ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही दंडवसुली आतापर्यंत सर्वांत उच्चांकी दंडवसुली आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी विविध प्रकारच्या केलेल्या कारवायांमध्ये यामध्ये किरकोळ आणि सहज टाळता येण्याजोग्या चुका वाहनचालकांकडून अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. किरकोळ स्वरूपाचे वाहतुकीचे नियमही पाळण्यात वाहनचालकांची मोठी उदासिनता कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. एरवी टाळता येण्याजोग्या सिग्नल तोडणे, नो एंट्रीमध्ये वाहन घालणे, नो पार्किंग, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन लावणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, काळ्या काचा लावणे, जोरजोरात हॉर्न वाजविणे, कागदपत्र जवळ न बाळगणे, विरुद्ध दिशेने येणे, पदपथावर वाहन लावणे अथवा चालवणे यासोबतच फॅन्सी नंबर प्लेट, लेन कटिंग वाहनांना रिफ्लेक्टर न लावणे, रहदारीस अडथळा करणे अशा टाळता येण्याजोग्या चुका वाहन चालकांकडून झालेल्या आहेत.किरकोळ स्वरूपाच्या वाटणाºया चुका केवळ दंड भरण्यापुरत्या मर्यादीत राहिलेल्या नसून या चुकांमुळेच अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अपघातांचे गांभिर्य कमी झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेदरकारपणा येऊ लागला आहे. विशेषत: दुचाकी आणि मोटार सायकलचालकांमध्ये हे प्रमाण अधिक पाहायला मिळते. वाहतुकीचे नियम वाहनचालकांच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी आहेत याचा विसर वाहनचालकांना पडलेला आहे. केवळ वाहन चालवता आले म्हणजे झाले, असे नसून वाहतूक साक्षरता येणेही आवश्यक आहे.विनाहेल्मेट कारवाई थंडावलीहेल्मेट वापर न करणाºयांवरील कारवाई थंडावली असून वर्षभरात २८ हजार जणांविरुद्ध हेल्मेट कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी १ कोटी ३९ लाख ६८ हजारांचा दंड वसूल केला आहे.केंद्र शासनाने नवीन कायदा करून वाहतूक नियमभंगाच्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवायांमधील दंड वसुलीच्या रकमेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी वाहतूक पोलीस वर्षभर विविध प्रकारच्या जनजागृती मोहिमा घेत असतात़ यासोबतच स्वयंसेवी संस्था आणि शालेय विद्यार्थीही रस्त्यावर उतरून वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करत असतात़ मात्र, वाहनचालकांमध्ये अद्यापही वाहतुकचे नियम पाळण्याबाबत जागरुकता आलेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे़

टॅग्स :Puneपुणे