शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'दगडूशेठ' गणपतीसमोर ३६ हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 09:12 IST

महाराष्ट्रातून आलेल्या महिलांच्या गर्दीचा उच्चांक ...

पुणे : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि... असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरया च्या जयघोषाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात ३६ हजार महिलांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण केले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर झालेल्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमी निमित्त पहाटे ३६ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, अमर कोद्रे, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, विलास रासकर, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यांसह विश्वस्त व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

रशिया व थायलंड येथून आलेल्या परदेशी भक्तांनी देखील यावेळी सहभाग घेतला. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३६ वे वर्ष होते. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. तसेच हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले. मोबाईलचा टॉर्च उंचावून देखील महिलांनी गणरायाचा जयघोष केला. 

पहिले २० महिलांचे पथक पहाटे २ वाजता उपस्थित झाले. तेव्हापासूनच महाराष्ट्रभरातून उपक्रमास आलेल्या महिलांची येथे येण्यास सुरुवात झाली. पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकाच्या पुढेपर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता. गणेशोत्सवाचा गौरव वाढविणारा हा कार्यक्रम असल्याची भावना उपस्थित मान्यवर आणि महिलांनी यावेळी व्यक्त केली. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड