३५ वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह टाकून दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:11 IST2021-02-08T04:11:14+5:302021-02-08T04:11:14+5:30

धनकवडी : कात्रज जुन्या बोगद्याजवळ एका अज्ञात तरुणाचा खून करून मृतदेह टाकण्यात आल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. घटनास्थळी ...

A 35-year-old man was killed and his body dumped | ३५ वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह टाकून दिला

३५ वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह टाकून दिला

धनकवडी : कात्रज जुन्या बोगद्याजवळ एका अज्ञात तरुणाचा खून करून मृतदेह टाकण्यात आल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस दाखल झाले. खून झालेल्या तरुणाचे वय अंदाजे ३५ वर्षे असून या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुना कात्रज बोगद्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचा मृतदेह टाकण्यात आला असल्याची माहिती शनिवारी सकाळी नियंत्रण कक्षाला मिळाली. नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहिती नुसार घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस दाखल झाले, मृतदेहाची माहिती घेत असता, मृतदेहाच्या खिशात मिळालेल्या आधार कार्ड वरुन त्या तरुणाचे नाव अजित सिंह, वय ३५ वर्षे असे असण्याची शक्यता आहे. मात्र आधार कार्ड वर फोटो नसल्याने खात्रीपूर्वक सांगता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुना कात्रज बोगद्याजवळ एका ३५ वर्ष वय असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेली आहे. सदर व्यक्तीने अंगामध्ये निळी जीन्स पॅन्ट, पायात शूज, अंगात लाल रंगाचा शर्ट घातलेला आहे. सदर व्यक्ती कोठून मिसिंग असल्यास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी केले आहे.

Web Title: A 35-year-old man was killed and his body dumped