पुणो : शाळेत विद्याथ्र्याची अपुरी पटसंख्या, भौतिक सुविधांचा अभाव, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व शिक्षकांची वानवा आहे. त्यामुळे राज्य शासनाने महापालिकेच्या तब्बल 35 शाळांना अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे या सर्व शाळा अनधिकृत असल्याची नोटीस शिक्षण मंडळाने नुकतीच बजाविली. त्यामध्ये मराठी, इंग्रजी व ऊदरू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे.
महापालिका शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळांची संख्या 417 एवढी आहे. शिक्षण मंडळाला शाळा सुरू करण्यासाठी राज्य शिक्षण उपसंचालक विभागाकडून मान्यता आवश्यक असते. त्यासाठी विद्याथ्र्याची पटसंख्या, शाळेच्या मैदानासह भौतिक सुविधा आणि शिक्षकांच्या पात्रतेचा निकष पूर्ण करावे लागतात. मात्र, गेल्या काही वर्षात नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य सभेत प्रस्ताव आणून अनेक शाळा परस्पर सुरू केल्या आहेत. त्या पाश्र्वभूमीवर शिक्षण संचनालयाच्या निकषानुसार शाळांची तपासणी शिक्षण मंडळाकडून सप्टेंबर महिन्यात केली. शाळा तपासणीसाठी पर्यवेक्षकांची स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. त्याविषयीचा अहवाल शिक्षणप्रमुख बबन दहिफळे यांना सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये महापालिकेच्या तब्बल 35 शाळा आवश्यक निकषानुसार नसल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती उपशिक्षण प्रमुख शुभांगी चव्हाण यांनी दिली. शिक्षण मंडळाकडून यापूर्वी काही शाळांच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. परंतु, अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामध्ये नांदेड फाटा, वडगाव खुर्द, बाणोर, लोहगाव, आंबेगाव पठार, कोंढवा, अप्पर, बिबवेवाडी, बालाजीनगर, काळे बोराटेनगर, वारजे, कोरेगाव पार्क, कोंढवा खुर्द, टिंगरेनगर, सिंहगड रस्ता, नगर रस्ता, विमाननगर, नागपूर चाळ, खराडी या परिसरातील मराठी, इंग्रजी व उर्दू शाळांचा समावेश आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तर शाळा बंद करणार..
4शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत दर वर्षी शासनाची मान्यता नसलेल्या अनधिकृत शाळांची यादी मे महिन्यात जाहीर केली जाते. शासनाने महापालिकेच्या 35 शाळांना मान्यता न दिल्यास, या शाळा बंद कराव्या लागणार आहेत, अशी माहिती शिक्षणप्रमुख बबन दहिफळे यांनी दिली.
कारभारी अंधारात..
4शिक्षण मंडळाच्या 35 शाळा अनधिकृत ठरविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने परस्पर तयार केला आहे. त्याविषयी शिक्षण मंडळाच्या सदस्यांना विश्वासात घेण्यात
आले नाही. आम्हाला त्याविषयी कोणताही माहिती दिलेली नाही, असे शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप धुमाळ यांनी सांगितले.