नीरा शहरात शहरात कोरोनाचे ३५ रुग्ण अॅक्टिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:07 IST2021-02-05T05:07:53+5:302021-02-05T05:07:53+5:30
कोरोना अजून गेला नसून नागरिकांनी यापुढेही काळजी घेणे घेणे जरूरीचे आहे, असे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सांगितले जात आहे. नीरा ...

नीरा शहरात शहरात कोरोनाचे ३५ रुग्ण अॅक्टिव्ह
कोरोना अजून गेला नसून नागरिकांनी यापुढेही काळजी घेणे घेणे जरूरीचे आहे, असे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सांगितले जात आहे.
नीरा (ता.पुरंदर) येथे कोरोना रुग्णांची संख्या
गेल्या एक - दोन महिन्यांपासून घटलेली होती. मात्र कोरोना संपला या समजूतीत बहुसंख्य नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत. तसेच सामाजिक आंतरही राखत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. आठवडे बाजारात तर तोबा गर्दी होत असते, लोक कोरोना गेल्याच्या अविर्भावात बिनदिक्कतपणे विनामास्क फिरू लागले आहेत. डिसेंबर महिन्यात नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र अंकीत सहा गावात ६४ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले. एकट्या नीरा शहरात ४१ रुग्ण तर इतर गावांत २३ रुग्ण कोराना पाॅझिटिव्ह आढळले. नीरा ग्रामपंचायतीची निवडणुक संपल्यापासून नीरा गावातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मागील आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकेल याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या नीरा गावात सुमारे ३५ अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असले तरी त्यामध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंंतर या कोरोना नियमांंचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.