रक्तदान शिबिरात ३४१ बाटल्या रक्तसंकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:09 IST2021-05-11T04:09:45+5:302021-05-11T04:09:45+5:30
कोरोनाच्या काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. त्यामुळे रक्ताचा मागणी वाढली आहे. मात्र सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून ...

रक्तदान शिबिरात ३४१ बाटल्या रक्तसंकलन
कोरोनाच्या काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. त्यामुळे रक्ताचा मागणी वाढली आहे. मात्र सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून शासनाने रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलित करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजक तथा युवानेते विकास गायकवाड यांनी केंदूर - पाबळ जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करून सुमारे ३४१ बाटल्या रक्त संकलित केले आहे. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व टी - शर्ट देऊन गौरविण्यात आले.
अठरा वयोगटांवरील तरुणांना लसीकरण केल्यानंतर किमान दोन - अडीच महिने रक्तदान करता येणार नसल्याने लसीकरणापूर्वी रक्तदान करणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमावलीचे पालन करून शिबिर आयोजित केले असल्याचे विकास गायकवाड यांनी सांगितले.