शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बहिष्कार प्रकरणी शिया मुस्लिम समाजाच्या पदाधिकार्‍यांसह ३४ जणांवर गुन्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 19:04 IST

सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून जुन्नर येथील शिया मुस्लिम समाजाच्या मदरसा ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांसह एकूण ३४ जणांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकलम ५०६, बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६चे कलम ३ (१) (२) (४) नुसार ३४ जणांवर गुन्हासामाजिक बहिष्कार टाकला म्हणून गुन्हा दाखल होण्याचा हा जुन्नरमधील पहिलाच प्रकार

जुन्नर (पुणे) : सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून जुन्नर येथील शिया मुस्लिम समाजाच्या मदरसा ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांसह एकूण ३४ जणांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याचा हा जुन्नरमधील पहिलाच प्रकार असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणेच्या वतीने जुन्नर पोलिसांकडे  सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. जुन्नर येथील शिया मुस्लिम समाजाच्या मदरसा ट्रस्टमध्ये मदतनीस म्हणून काम करणारे हमीदउल हसन सय्यद (वय ३५, रा. सय्यदवाडा, जुन्नर) यांनी याबाबत जुन्नर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. या फिर्यादीप्रमाणे जुन्नर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०६, महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६ चे कलम ३ (१) (२) (४) नुसार एकूण ३४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हमीदुल सय्यद याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शिया समाजाच्या मदरसा ट्रस्टमध्ये जानेवारी २०१५ ते नोव्हेंबर २०१५ या काळात कामकाज करीत असताना मी व्यवस्थित काम करीत नाही, मनानेच काम करतो, कामात पैसे खातो, असे आरोप करण्यात येऊन एप्रिल २०१६मध्ये  मला शिया मुस्लिम समाजातून बहिष्कृत केल्याबाबत शिया जामा मशिदीसमोरील पब्लिक नोटीस बोर्डावर नोटीस लावण्यात आली होती. तसेच, आॅक्टोबर २०१६मधील मोहरम अशुरा या मिरवणुकीत असताना कलबेअली सय्यद व मोहमद हमीदसय्यद, शमीम सय्यद यांनी माझ्या हातातून माईक काढून घेऊन धक्काबुक्की करून मिरवणुकीतून हाकलून दिले. मला समाजातून बहिष्कृत केल्याने  माझ्या  किराणा मालाच्या दुकानामध्ये किराणा घेण्यासाठी कोणी येत नसल्याने माझे आर्थिक नुकसान झाले आहे. समाजातील चाली-रूढी बंद व्हाव्यात तसेच समाजातील इतर  कोणावर असा बहिष्कार टाकला जाऊ नये, याकरिता मी फिर्याद दाखल करीत  आहे. फिर्यादीनुसार जुन्नर पोलिसांनी समाजातील पंच इस्माईल रोशनअली सय्यद, अध्यक्ष शिया जमात तसेच आमिरअली  सय्यद , मोहमद अब्बास सय्यद, मोहमद काझीम सय्यद, सुलतानअली सय्यद, नजीर हुसेन सय्यद, कलबे अब्बास सय्यद, मुराद अब्बास सय्यद, मोहमद तफजुल सय्यद, मोहमद मतीन सय्यद, मोहमद वसीम सय्यद, मोहमद हमीद सय्यद, अदिल अब्बास सय्यद, नौरोज हसन सय्यद, रजा हसन सय्यद, अली नकी सय्यद, मोहमद नबी सय्यद, मोहमद यावर सय्यद, दिलबर मेहंदी सय्यद, नुरे अब्बास सय्यद,नफिस हुसेन सय्यद, सज्जद हुसेन सय्यद,मोहमद जफर सय्यद, मोहमद मुबीन सय्यद, नौशाद अली सय्यद,मोहमद शेर सय्यद, कलबे अली सय्यद, सरकार मेहंदी सय्यद, मोहमद अब्बास सय्यद, समर हैदर सय्यद, दिलावर हुसेन सय्यद, मोहमद सईदअली सय्यद , रहेबर हुसेन सय्यद (सर्व जण रा. सय्यदवाडा, जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हमीदुल सय्यद व त्याची पत्नी व २ मुलांना बहिष्कृत केल्याचे त्याने पोलिसांनकडे सांगितले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शीतल चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :Muslimमुस्लीमCrimeगुन्हाPoliceपोलिस