शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pune: भाटघर धरणात ३३ टक्के तर निरादेवघर मध्ये ३५ टक्के पाणीसाठा, २ हजार ७४० क्युसेकने विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 13:06 IST

सध्या दोन्ही धरणांतून २७४० क्युसेकने पाण्याचा विर्सग सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे....

भोर (पुणे) : ब्रिटिशकालीन भाटघर धरणात ३३ टक्के, तर निरादेवघर धरणात ३५.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के पाणीसाठा कमी आहे. भाटघर धरणातून १९८७ क्युसेकने तर निरादेवघर धरणातून ७५० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. सध्या दोन्ही धरणांतून २७४० क्युसेकने पाण्याचा विर्सग सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

गतवर्षी भाटघर धरण ३४ टीएमसी तर निरादेवघर धरण ११.९१ टीएमसी पाणीसाठा असलेली दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. मागील वर्षी भाटघरमध्ये ४२ टक्के तर निरादेवघर धरणात ५५.३५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यावेळी भाटघर धरणात १० टक्के, तर निरादेवघर धराणात १५ टक्के पाणीसाठा कमी आहे. वीर धरणात सध्या ४५.४० टक्के तर गुंजवणी धरणात ४४.२३ टक्के पाणीसाठा असून गतवर्षी वीर धरणात ६३.८८ टक्के तर गुंजवणी धरणात ६०.२७ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही धरणांत १८ टक्के पाणीसाठा कमी आहे.

वीर धरणातून निरा डाव्या कालव्यात ८२७ क्युसेकने तर निरा उजव्या कालव्यातून १५५० क्युसेकने पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी सोडण्यात येत आहे. दोन्ही कालव्यांतून पुरंदर, फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या पूर्वीकडील तालुक्यांना पाणी सोडण्यात येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच धरणांत २० टक्के पाणीसाठा कमी असून सध्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो असाच कायम राहिल्यास पुढील अडीच महिन्यांत धरणे रिकामी होऊन भोर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकेल.

भोर, वेल्हे तालुक्यातील भाटघर निरादेवघर गुंजवणी धरणात दर वर्षी पावसाळ्यात ४० टीएमसी पाणीसाठा होतो. मात्र, उन्हाळ्यात धरणे रिकामी होतात आणी दरवर्षी भोर वेल्हे तालुक्यात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. यामुळे टाकी भोरला आणी नळ पूर्व भागाला अशी अवस्था आहे. भोर तालुक्यात कालवा समितीच्या बैठकीत पाणी सोडण्याचे योग्य निर्णय घेतले जात नसल्यामुळे ही अवस्था असून पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणे