कुकडीत ३२.९८ टक्के पाणीसाठा
By Admin | Updated: August 6, 2015 03:43 IST2015-08-06T03:43:40+5:302015-08-06T03:43:40+5:30
जुन्नर व आंबेगाव या तालुक्यांतील ५ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नव्याने २५२ द़ ल़ घ़ फू. पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़

कुकडीत ३२.९८ टक्के पाणीसाठा
नारायणगाव : जुन्नर व आंबेगाव या तालुक्यांतील ५ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नव्याने २५२ द़ ल़ घ़ फू. पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ १ जूनपासून झालेल्या पावसाने १ हजार २४७ द.ल.घ.फू. पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ कुकडी प्रकल्पातील सर्व धरणांत ३२.९८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १चे कार्यकारी अभियंता नन्नोर यांनी दिली़
दोन दिवसांपासून सलग पावसाला सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ दिवसभरात या पाचही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे धरणांची पाणीपातळी वाढू लागली आहे़
१ जूनपासून पाचही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १२५ द.ल.घ.फू. पाणी नव्याने उपलब्ध झाले आहे़ चिल्हेवाडी धरणातून १ हजार १५० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू
असल्याने येडगाव धरणाचीही पाणीपातळी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे़
वडज धरणामध्ये ५७.१२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ३११ मिलिमीटर पाऊस झाला आहे़ तर दिवसभरात ४ मिलिमीटर पाऊस झाला़ सतंतधार पाऊस राहिल्यास या परिसरातील धरणे लवकरच भरणार आहेत.
माणिकडोह धरणामध्ये आजमितीस १८.१५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात
१ जूनपासून ४६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे़ दिवसभरात १० मिलिमीटर पाऊस
झाला आहे़
पिंपळगाव जोगा धरणामध्ये आजमितीस ३८.१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ४७१ मिलिमीटर पाऊस झाला आहे़ तर दिवसभरात १४ मिलिमीटर पाऊस झाला आहे़ या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे़
आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणामध्ये ४७.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ४४६ मिलिमीटर
पाऊस झाला आहे़ आज
दिवसभरात ३ मिलिमीटर पाऊस पडाला, अशी माहिती नन्नोर
यांनी दिली़
(वार्ताहर)