शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांमुळे ३२ मुले गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 01:56 IST

मित्राने आणलेली मोटारसायकल पाहून तो त्याच्याबरोबर मागे बसला व ते फिरत असताना त्यांना पोलिसांनी पकडले.  मित्राबरोबर त्याच्यावरही वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला.

- विवेक भुसेपुणे  - मित्राने आणलेली मोटारसायकल पाहून तो त्याच्याबरोबर मागे बसला व ते फिरत असताना त्यांना पोलिसांनी पकडले.  मित्राबरोबर त्याच्यावरही वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे घरातील तसेच आजूबाजूचे लोकही त्याच्याकडे वाईट नजरेने पाहू लागले़ कोणताही सहभाग नसताना त्याच्यावर चोरीचा शिक्का बसला. प्रचंड नैराश्य आलेल्या या मुलाला पोलिसांनी मार्गदर्शन व मदत केल्याने तो आता या सर्व परिस्थितीतून बाहेर आला आहे़ आता तो बारावीत आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमध्ये बालगुन्हेगारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे़ एकदा त्यांच्यावर एखादा गुन्हा दाखल झाला की त्याच्याकडे आजूबाजूचे लोक गुन्हेगार, चोर म्हणून पाहतात़ मित्रांकडून हेटाळणी होते़ त्यामुळे तो इतरांपासून तुटत जाऊन आपोआप गुन्हेगारीकडे ओढला जातो़ त्यातून कायमचा गुन्हेगार होतो.पुणे शहरात गेल्या तीन वर्षांत तब्बल दीड हजार अल्पवयीन मुले बालगुन्हेगार किंवा विधीसंघर्षित ठरले आहे़ ही मुले कायमस्वरूपी गुन्हेगारीत ओढली जाऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष बालपथकाची स्थापना केली आहे़ या माध्यमातून मुलांचे तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले जाते़ त्यांना यातून दूर करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाऊ लागली आहे. पुणे पोलिसांनी ३२ मुलांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारीपासून दूर केले आहे़ अल्पवयीन मुलांकडून अनेकदा हौस म्हणून वाहनचोरी करून ती फिरविली जाते़ त्यात ते पकडले गेले की, त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसतो़ अनेकदा काही जण त्यांचा वापर करून घेत असतात़याबाबत विशेष बालपथकाचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब भोर यांनी सांगितले की, भरोसा सेल अंतर्गत विशेष बालपथकाची स्थापना करण्यात आली आहे़विधीसंघर्षग्रस्त मुलांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारीपासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ त्यासाठी या क्षेत्रात कामकरणारे कार्यकर्ते तसेच १९ सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येत आहे. विधीसंघर्षग्रस्त मुलांची संख्या मोठी आहे़ त्यामुळे त्यांच्या तसेच त्यांच्या पालकांच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.  जात आहे़ आतापर्यंत २२ पोलीस ठाण्यांमध्ये अशा बैठका घेण्यात आल्या आहेत़या मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय मदत करता येतील़ शिक्षण घेण्यासाठी मदत हवी आहे का? काही मुले आता १८ वर्षांची झाली आहेत़ त्यांना नोकरीची गरज असते़ त्याच्यासाठी प्रयत्न केला जात आहे़मुले आणि पालकांची दर महिन्यांना एकत्रित बैठका घेण्यात येणार असून त्यातून या मुलांना व त्यांच्या पालकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ त्यासाठी स्वंयसेवी संस्थांची मदत घेतली जात असल्याचे भोर यांनी सांंगितले़गेल्या तीन वर्षांत सुमारे दीड हजार विधीसंघर्षग्रस्त मुलेमुले व पालकांच्या एकत्रित बैठका घेऊन त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्नस्वयंसेवी संस्थांची मदतआतापर्यंत ३२ मुलांचे समुपदेशनशिक्षण, नोकरीसाठी मुलांना सहाय्यमुलांच्या हक्काचे सरंक्षण होईल याकडे लक्षलवकरच सर्वांचा एकत्रित मेळावा घेण्याचे नियोजन1 एक मुलगा सातवी शिकत असताना त्याच्यावर सायकल चोरीचा आरोप झाला़ त्यामुळे तो मनातून खचला होता़ त्याचे व त्याच्या पालकांचे पोलिसांनी समुपदेशन केले़ शिक्षणासाठी मदत केली़ त्यातून तो दहावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे़2या मुलांकडे व त्यांच्या पालकांकडे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर देण्यात आले आहेत़ त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले आहे़3पोलिसांनी बोलावले म्हटल्यावर पूर्वी ही मुले व त्यांचे पालक येण्यास घाबरत असत़ त्यांना वाटायचे की हे आपल्याला एखाद्या गुन्ह्यात अडकवतील़ आता त्यांना विश्वास वाटू लागल्याने ते स्वत: होऊन विशेष बालपथकाच्या कक्षात येऊ लागले आहेत़ या सर्वांचा एकत्रित मेळावा लवकरच घेण्याचा विचार असल्याचे बाळासाहेब भोर यांनी सांगितले़ 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस