जिल्ह्यात काँग्रेसचे ३१ इच्छुक

By Admin | Updated: August 14, 2014 04:24 IST2014-08-14T04:24:42+5:302014-08-14T04:24:42+5:30

भोर मुळशी वेल्हा मतदारसंघातून संग्राम थोपटे यांच्यासह नव्या जुन्या काळातील कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले असून, मावळमधून ७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

31 interested in Congress in the district | जिल्ह्यात काँग्रेसचे ३१ इच्छुक

जिल्ह्यात काँग्रेसचे ३१ इच्छुक

पुणे : जिल्हा काँग्रेसने विविध मतदारसंघांमधील ३१ इच्छुकांची यादी प्रदेश काँग्रेसला सादर केली. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील, भोर मुळशी वेल्हा मतदारसंघातून संग्राम थोपटे यांच्यासह नव्या जुन्या काळातील कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले असून, मावळमधून ७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
मावळमधून चंद्रकांत सातकर, किरण गायकवाड, विलास विकारी, ज्ञानोबा काळोखे व दिलीप ढमाले, शांताराम नरवडे यांनी तर शिरूरमधून कौस्तुभकुमार गुजर, कांतिलाल गवारी, अरविंंद ढमढेरे यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
दौंडमधून पोपटराव ताकवणे, विठ्ठलराव खराडे, भास्करराव तुळवे यांनी तर खेडमधून जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना सातपुते यांच्यासह जनार्दन दांगट, नंदाताई कड यांनी उमेदवारी मागितली आहे.
खडकवासला मतदारसंघातून श्रीरंग चव्हाण पाटील, हरिदास चरवड यांनी अर्ज केले आहेत. खेड-आळंदी मतदारसंघात कालिदास वाडेकर, दिलीप मेदगे, सोमनाथ दौंडकर, अमोल पवार यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे.
पुरंदरमधून संजय
जगताप, जुन्नरमधून गणपतराव फुलवडे तर बारामतीतून रवींद्र रणसिंंग, आकाश मोरे इच्छुक आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 31 interested in Congress in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.