डिंभे धरण कालवा दुरुस्तीसाठी ३१ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:13 IST2021-08-14T04:13:39+5:302021-08-14T04:13:39+5:30
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची कुकडी पाटबंधारे विभागाअंतर्गत सिंचन व बिगरसिंचन कामांबाबत ३१ मार्च रोजी जलसंपदामंत्री जयंत ...

डिंभे धरण कालवा दुरुस्तीसाठी ३१ कोटी मंजूर
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची कुकडी पाटबंधारे विभागाअंतर्गत सिंचन व बिगरसिंचन कामांबाबत ३१ मार्च रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक झाली होती. या वेळी सदर दुरुस्तीसाठी आवश्यक निधी तसेच या सर्व दुरुस्तीच्या कामांना तातडीने मंजुरी मिळावी, अशी मागणी वळसे पाटील यांनी केली होती. या सर्व कामांसाठी शासनाने निधीची तरतूद केली असून दुरुस्तीच्या कामांना लवकरच सुरवात होणार आहे.
डिंभे डावा कालव्याच्या ५५ किमी अंतरामधील गळती प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत बांधकामाची दुरुस्ती, अस्तरीकरण आणि भराव यासाठी २७ कोटी २२ लक्ष एवढी तरतूद केली आहे. तसेच डिंभे उजवा कालवा अस्तरीकरण दुरुस्ती, गेट दुरुस्ती इत्यादी कामांसाठी ९०.७८ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मीना शाखा व पूरक कालवा बांधकामाची दुरुस्ती आणि गळती प्रतिबंधक कामासाठी ६४.७२ लक्ष रुपयांची तरतूद केली आहे.
घोड नदीवरील सुलतानपूर, पिंपळगाव-खडकी, काठापूर, सदरवाडी या ठिकाणच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधारे दुरुस्तीसाठी १९७.०६ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंचर शहर नळ पाणीपुरवठा योजना सुलतानपूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून कार्यान्वित केली आहे. मंचर शहराला उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ६८ लाख ६८ हजार तसेच पिंपळगाव खडकीसाठी १४.३४ लक्ष, काठापूरसाठी ३३.३४ लक्ष, तर सरदवाडीसाठी २९.८५ लक्ष निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मीना नदीवरील वळती-नागापूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पाणीगळती प्रतिबंधक कामासाठी १०.४९ लक्ष रुपये, तर कुकडी नदीवरील आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील म्हसे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी ८.४६ लक्ष, भाकरेवाडी, बाबरमळा आणि वडनेर येथील पिअर दुरुस्ती आणि गळती प्रतिबंधक काम करण्यासाठी ११.८९ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
13082021-ॅँङ्म-ि04 झ्र डिंभे धरण