शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

...३० वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग

By admin | Updated: November 8, 2016 01:09 IST

श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर येथील १९८६च्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल ३० वर्षांनी एकत्र आले. त्या वेळी शिकवत असलेल्या गुरुजनांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला.

काटेवाडी : श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर येथील १९८६च्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल ३० वर्षांनी एकत्र आले. त्या वेळी शिकवत असलेल्या गुरुजनांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. सन १९८६ ला इयत्ता दहावीची परीक्षा देऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या बालमित्रांची भेट होत नव्हती. ठराविक मित्र सुसंवाद साधत होते, या संवादातून स्नेह मेळाव्याची कल्पना पुढे आली. संवादातून मेळाव्याची तारीख ठरली. संजय पवार, वसंतराव जगताप, अविनाश मोटे, परशुराम रायते, सुधाकर झगडे, नामदेव पवार, दतात्रय गिरी, संगीता गवळी, सुशीला खांडेकर, भारती काळे आदींनी पुढाकार घेतला. सकाळी दहा वाजता शिपाई गावडे यांनी घंटा दिली. त्यानंतर पुन्हा ३० वर्षांनी शाळा भरली. तत्कालीन पीटी शिक्षक सोनवणे यांनी प्रार्थना घेतली. यानंतर उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान व दिवंगत झालेल्या सहकारी मित्र व शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ३० वर्षांनी भेटल्याने ओळख करून देईपर्यंत विद्यार्थी एकमेकांना ओळखू शकले नाही. सुरेश झालटे, सर्जेराव पवार, आर. डी कुलकर्णी, डी. बी मोरे, करंदीकर, रज्जाक मणेरी या शिक्षकांनी संस्काराचे तास घेतले. तसेच उर्वरित आयुष्यात समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जावेत, संस्कार हद्दपार होत आहेत त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन शिक्षक मोटे उपस्थित होते. त्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन करून तीस वर्षांनी सर्वांना एकत्र केले. पुन्हा शालेय आठवणीला उजाळा दिला. याबद्दल उपक्रमाचे कौतुक केले. उपस्थित सर्व शिक्षकांचा सन्मान बाळासाहेब शिंदे, अनिल सपकळ, बाळकृष्ण टकले, गणेश सपकळ, दादा पिसे, आशा गायकवाड, प्रतिभा गिरंजे, संगीता भिसे आदींनी केला. सूत्रसंचालन रवींद्र खवळे यांनी केले. यावेळी श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे, प्राचार्य एस. बी. थोरात, अप्पा कोळेकर, अशोक निंबाळकर, मासाळ सर, भागवत घुले, काशीनाथ गावडे, दत्तात्रय कोळेकर, देवकरसर उपस्थित होते.(वार्ताहर)