पार्ट्यांवर ३० पथकांची नजर

By Admin | Updated: December 30, 2015 03:19 IST2015-12-30T03:19:22+5:302015-12-30T03:19:22+5:30

नववर्षांच्या स्वागतासाठी शहर आणि ग्रामीण भागातील हॉटेल, फॉर्म हाऊस आणि पब्ज सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात हजारो पार्ट्यांचे आयोजन केले जात असताना २९ डिसेंबरपर्यंत केवळ

30 teams eye on parties | पार्ट्यांवर ३० पथकांची नजर

पार्ट्यांवर ३० पथकांची नजर

पुणे : नववर्षांच्या स्वागतासाठी शहर आणि ग्रामीण भागातील हॉटेल, फॉर्म हाऊस आणि पब्ज सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात हजारो पार्ट्यांचे आयोजन केले जात असताना २९ डिसेंबरपर्यंत केवळ ६३ आयोजकांनीच परवानगी घेतली आहे. गतवर्षी हीच संख्या दीडशेपर्यंत गेली होती. त्यामुळे करमणूक कर बुडविणाऱ्या आयोजकांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३० पथकांची नेमणूक केली असून, कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत.
याबाबत राव यांनी सांगितले, की गत वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत अत्यंत कमी लोकांनी थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांसाठी परवानगी घेण्यासाठी अर्ज केले आहेत. शहर आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन होत असताना आलेले अर्ज खूपच कमी आहेत. त्यामुळेच विनापरवानगी पार्टी करणाऱ्यांवर आयोजकांवर कडक कारवाई करून दहा पट दंड व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली ३० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके परवानगी घेतलेल्या व परवानगी न घेतलेल्या सर्वच हॉटेल्स, पब्ज, फॉर्म हाऊस, लॉन्स आदी ठिकाणी तपासणी करणार आहेत. या तपासणीमध्ये अनधिकृत तिकीट विक्री, मद्यविक्री, परवानगीपेक्षा अधिक लोकांची संख्या असल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
शहरात दर वर्षी सरासरी शंभर ते दीडशे आयोजक करमणूक कर विभागाची परवानगी घेतात. परंतु विविध वृत्तपत्रे, रस्त्यावर लागलेले पोस्टर आणि गुगलवर सर्च दिल्यास एकट्या कोरेगाव पार्कमध्ये पन्नासहून अधिक हॉटेलमध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात आल्याचे निदर्शनास येते.

खासगी पार्ट्यांवरही वॉच
व्यावसायिक पार्ट्याप्रमाणेच खासगी पार्ट्यांवरदेखील जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेले पथके वॉच ठेवणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीशिवाय दोन बाटल्यापेक्षा अधिक मद्य आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. खासगी पार्ट्यांसाठी आतापर्यंत ८५ गु्रपने परवानगी घेतली आहे.

Web Title: 30 teams eye on parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.