ओतूर परिसरात दोन दिवसांत ३० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:11 IST2021-09-22T04:11:15+5:302021-09-22T04:11:15+5:30
रविवारी ओतूर ४, डिंगोरे २, खामुंडी १, नेतवडमाळवाडी व बल्लाळवाडी ३, उदापूर ८, मांदारणे २, असे २२ रुग्ण सापडले ...

ओतूर परिसरात दोन दिवसांत ३० रुग्ण
रविवारी ओतूर ४, डिंगोरे २, खामुंडी १, नेतवडमाळवाडी व बल्लाळवाडी ३, उदापूर ८, मांदारणे २, असे २२ रुग्ण सापडले होते, अशी माहिती डॉ. श्रीहरी सारोक्ते व डॉ. यादव शेखरे यांनी दिली. सोमवारी ओतूर ४, उदापूर ३, मांदारणे १ असे ८ नवीन रुग्ण सापडले आहेत. ओतूर येथील १ हजार ४०१ पैकी १ हजार ३११ बरे झाले आहेत. ३९ जण कोविड सेंटरमध्ये तर ९ जण घरीच उपचार घेत आहेत. ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. उदापूर येथील ३३६ पैकी २९७ बरे झाले आहेत २८ जण उपचार घेत आहेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मांदारणे येथील २७ पैकी २२ बरे झाले आहेत ३ जण उपचार घेत आहेत २ जणांचा मृत्यू झाला आहे.