शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जा संबंधित प्रकल्पाच्या आमिषाने तीस लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 21:01 IST

फिर्यादींना सौरउर्जा संबंधित प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखविले तसेच फिर्यादींना परदेशात दोन कंपन्या रजिस्टर करायला लावल्या. त्यानंतर फिर्यादीसह त्यांच्या भागीदारांना त्याच्या कंपनीच्या बँक खात्यात रक्कम जमा करायला लावली.

ठळक मुद्देयाप्रकरणी आरोपीवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : सौरउर्जा संबंधित प्रकल्प मिळवून देण्याचे आमिषाने पुण्यातील महिलेची ३० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करणाºया आरोपीस कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. आरोपीने याप्रकारे जालना, अमरावती तसेच हैद्राबाद येथील नागरिकांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. राहुल करम सिंग (वय ४३, रा. रविराज आर्याना सोसायटी, साईनाथनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी श्वेता बाणोडे उर्फ श्वेता राहूल सिंग (गोल्ड जीमजवळ, हडपसर) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आाहे. याबाबत श्वेता नेमळेकर (वय ३३, रा. साईराम बंगला, भवानी पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार कोरेगाव पार्क  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या उच्चशिक्षित आहेत तसेच त्या नोकरीच्या शोधात होत्या. आरोपी राहुल सिंग आणि फिर्यादी महिलेची २०१६ मध्ये भेट झाली होती. आरोपीने हैद्राबाद येथे माझी कंपनी असून आय.बी.एम. आणि एस.टी.पी.आय. भारत सरकार यांच्याबरोबर भागीदारी असल्याची माहिती दिली.       फिर्यादींना सौरउर्जा संबंधित प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखविले तसेच फिर्यादींना परदेशात दोन कंपन्या रजिस्टर करायला लावल्या. त्यानंतर फिर्यादीसह त्यांच्या भागीदारांना त्याच्या कंपनीच्या बँक खात्यात रक्कम जमा करायला लावली आणि ३० लाख ७५ हजारांची फसवणूक केली होती. याप्रकरणी नोव्हेंबर २०१७ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस कर्मचारी विनोद साळुंके यांना आरोपीविषयी माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पार्क पोलिसांनी त्याला पुण्यातून ताब्यात घेतले. आरोपी हा सतत ठिकाणे बदलून राहत होता. त्यामुळे त्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. सिंग याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.  

टॅग्स :Koregaon Parkकोरेगाव पार्कCrimeगुन्हाfraudधोकेबाजीPoliceपोलिसCourtन्यायालय