मिठाईतील भेसळी प्रकरणी 3 वर्षे कैद
By Admin | Updated: October 18, 2014 01:48 IST2014-10-18T01:48:22+5:302014-10-18T01:48:22+5:30
कसबा पेठतील एका मिठाई विक्रेत्याला महापलिकेच्या न्यायालयाने तीन वर्षाची साधी कैद आणि 5 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

मिठाईतील भेसळी प्रकरणी 3 वर्षे कैद
पुणो : बालुशाहीवर शुद्ध चांदीचा वर्क वापरण्याऐवजी अॅल्युमिनियम फॉईलचा वापर केल्याप्रकरणी कसबा पेठतील एका मिठाई विक्रेत्याला महापलिकेच्या न्यायालयाने तीन वर्षाची साधी कैद आणि 5 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
अन्न पदार्थ भेसळ कायद्यातंर्गत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. विलास माणिकचंद वैष्णव यांचे कसबा पेठेत मिठाईचे दुकान आहे. पालिकेचे अन्न निरीक्षक अजित भुजबळ यांनी 2 जुलैला वैष्णव यांच्या दुकानातून बालुशाहीचा नमुना अन्न भेसळ कायद्यातंर्गत तपासणीसाठी घेतला होता. त्यावर अॅल्युमिनियम फॉईल असल्याचा अहवाल राज्य आरोग्य प्रयोग शाळेने दिला. त्यानुसार भुजबळ यांनी पालिकेच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात वैष्णव यांच्या विरोधात खटला दाखल केला होता. मिठाईवर शुद्ध चांदीचा वर्क वापरण्यास कायद्याने परवानगी आहे. मात्र वैष्णव यांनी चांदीच्या वर्कऐवजी अॅल्युमिनियम फॉईलचा वापर केला. अॅल्युमिनियम हा पदार्थ मानवी आरोग्यास घातक असल्याचे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले. (प्रतिनिधी)