तिसऱ्या मजल्यावरुन पडून ३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST2020-12-22T04:12:11+5:302020-12-22T04:12:11+5:30

पुणे : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली वाकून पहात असताना तोल जाऊन पडल्याने एका ३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ...

3-year-old girl dies after falling from third floor | तिसऱ्या मजल्यावरुन पडून ३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

तिसऱ्या मजल्यावरुन पडून ३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

पुणे : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली वाकून पहात असताना तोल जाऊन पडल्याने एका ३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना कोथरुडमधील महात्मा सोसायटीत रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.

अविष्का विशाल कोळपकर (वय ३ वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यातत आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील वृंदावन पार्कमधील महात्मा सोयायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर आविष्का ही आई वडिलांसोबत राहत होती. तिचे वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. अविष्का रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरात खेळत होती. तेव्हा तिच्या आईने मी भाजी घेऊन येते असे सांगून

त्यांनी तिला घरातच थांबण्यास सांगितले. त्या घराचा दरवाजा बाहेरून लॉक करून खाली गेल्या. थोड्या वेळानंतर अविष्का ही आई आली का हे पाहण्यासाठी गॅलरीत गेली. ती गॅलरीतून खाली वाकून पाहत होती. खाली पहात असताना अचानक तिचा तोल गेल्यामुळे ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अविष्का ही आई-वडिलांना एकुलती एक मुलगी होती.

Web Title: 3-year-old girl dies after falling from third floor