रोकड चोरीप्रकरणी ३ महिलांना अटक
By Admin | Updated: January 25, 2017 02:17 IST2017-01-25T02:17:34+5:302017-01-25T02:17:34+5:30
महिलेकडील दोन लाखांची रोकड चोरल्याप्रकरणी तीन महिलांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली.

रोकड चोरीप्रकरणी ३ महिलांना अटक
पुणे : महिलेकडील दोन लाखांची रोकड चोरल्याप्रकरणी तीन महिलांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली.
करुणा सुनील जाधव (वय ३५, रा. मुंढवा), गंगूबाई गणेश गायकवाड (वय ४०) आणि नंदा चंद्रकांत जाधव (वय ५१, रा. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुप्रिया ढोले यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १६ डिसेंबर रोजी दुपारी कात्रज ते लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकादरम्यान घडली.
सुप्रिया ढोले आणि त्यांचे पती हे बसमधून प्रवास करीत होते. ते लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ उतरले. दोन लाखांची रोकड घेऊन ते बँकेत भरण्यासाठी निघाले होते. या वेळी ढोले यांच्या पर्समधील रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी तिघींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. त्यांना २६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
(प्रतिनिधी)