शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

3 अल्पवयीन मुली, दिल्लीहून पुण्यात आल्या, हॉटेलमध्ये रूम मागण्यास गेल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 09:42 IST

पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला...

पुणे: मंगळवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान सोमवार पेठेतील नरपत गिरी चौकातील राजधानी हॉटेलमधून पोलिसांना फोन गेला. हा फोन हॉटेलचे मॅनेजर सुधाकर कमलाकर डांगे यांनी केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, हॉटेलमध्ये तीन अल्पवयीन मुली रूम मागण्यासाठी आलेले असून त्यांच्यासोबत कोणीही वयस्कर व्यक्ती नाही. पोलिसांनी तत्परता दाखवत लगेच हॉटेल गाठले त्यामुळे पुढील अनर्थ टळल आहे.

पोलीस उप निरीक्षक रणदिवे व पथक हे राजधानी हॉटेल या ठिकाणी पोहोचले असता, तेथे तीन अल्पवयीन मुली आढळून आल्या. त्यांना महिला पोलिस अंमलदारांच्या मदतीने पोलीस ठाण्यास आणण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्या नोकरीच्या शोधामध्ये पुणे येथे काल (मंगळवारी) सायंकाळी ९.१५ वाजण्याच्या दरम्यान पुणे स्टेशन येथे दिल्ली ते पुणे असा प्रवास ट्रेनने पोहोचलेले आहेत, असं समजलं. हे ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला होता. 

या तिन्ही मुली अठरा वर्षांच्या आतल्या आहेत. सर्वजण नोएडा येथील राहणाऱ्या आहेत. सदर मुलींकडे अधिक चौकशी केली असता, त्या घरामध्ये कोणाला काहीही न सांगता पुण्याला निघून आल्याचे माहिती मिळाली. याबाबत पुणे कंट्रोल रूम येथून दिल्ली पोलीस कंट्रोल रूम यांचा संपर्क क्रमांक प्राप्त करून त्याद्वारे नोएडा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. यामध्ये या मुली हरवल्याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे, अशी माहिती मिळाली.

या तिन्ही मुलींची ससून रुग्णालय येथे वैद्यकीय व कोविडची तपासणी करून सुरक्षिततेचे कामी बाल सुधारगृह मुंढवा येथे महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने सरकारी वाहनाने पाठवण्यात आलेले आहे. अशी माहिती समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी दिली आहे.

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्लीPoliceपोलिस