विहिरीत गुदमरून ३ मजुरांचा मृत्यू

By Admin | Updated: June 19, 2016 03:17 IST2016-06-19T03:17:48+5:302016-06-19T03:17:48+5:30

बेल्हा (ता. जुन्नर) येथील पिंगटआळी मधील विहिरीत घाण व गाळ काढण्यासाठी गेलेल्या ३ मजुरांचा एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात उग्र वासामुळे गुदमरून मृत्यू झाला.

3 laborers died in a dump in the well | विहिरीत गुदमरून ३ मजुरांचा मृत्यू

विहिरीत गुदमरून ३ मजुरांचा मृत्यू

बेल्हा (जि. पुणे) : बेल्हा (ता. जुन्नर) येथील पिंगटआळी मधील विहिरीत घाण व गाळ काढण्यासाठी गेलेल्या ३ मजुरांचा एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात उग्र वासामुळे गुदमरून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १८) सायंकाळच्या सुमारास घडली. रात्री उशीरा अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मजुरांचे मृतदेह बाहेर काढले.
विलास सुखदेव पवार (वय २५) सुखदेव बाबूराव पवार (वय ५५) हे पितापुत्र तसेच संदीप राजू पवार (वय २२) अशी मृतांची नावे असून तिघेही बेल्हा इंदिरानगर कॉलनी येथील रहिवासी आहेत. संदीप हा विलासचा चुलतभाऊ आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीच्या मालकीची ही विहीर आहे. या विहिरीतून घाण व गाळ काढण्यासाठी हे तिघे जण आले होते. विहिरीतून मोठ्या प्रमाणावर उग्र वास येत होता. त्या विहिरीत थोडे पाणीही होते. गाळ काढण्यासाठी सर्वप्रथम संदीप हा विहिरीत उतरला. त्याला उग्र वास येताच भोवळ आली आणि तो त्यात अडकला. त्याला वाचविण्यासाठी विलास हा उतरला. तो ही उग्र वासामुळे गुदमरला. त्याला काढण्यासाठी सुखदेव पवार हे ही विहिरीत उतरले. ते ही उग्र वासामुळे गुदमरले. चौथा मात्र यांची अवस्था पाहूनच विहिरीच्या मध्यातूनच वर आल्याने बचावला. (वार्ताहर)

Web Title: 3 laborers died in a dump in the well