ओतूर परिसरातील तेजेवाडी येथे ३ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:13 IST2021-02-13T04:13:04+5:302021-02-13T04:13:04+5:30

९ फेब्रुवारीपासून ओतूर परिसरात पुन्हा कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. दि.९ रोजी तेजेवाडी येथे ३, डुंबरवाडी येथे १ ...

3 corona positive at Tejewadi in Ootur area | ओतूर परिसरातील तेजेवाडी येथे ३ कोरोना पाॅझिटिव्ह

ओतूर परिसरातील तेजेवाडी येथे ३ कोरोना पाॅझिटिव्ह

९ फेब्रुवारीपासून ओतूर परिसरात पुन्हा कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. दि.९ रोजी तेजेवाडी येथे ३, डुंबरवाडी येथे १ धोलवड १ ओतूर शहर १ सापडले. १२ फेब्रुवारी रोजी तेजेवाडी त पुन्हा ३ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. तेजेवाडी येथील बाधितांची संख्या ३७ झाली असून त्यापैकी ३० बरे झाले आहेत. ५ जणांवर उपचार सुरू आहेत .१ जण घरीच उपचार घेत आहे. एकाचा मृत्यू झाला आहे.

ओतूर परिसराने ९०० संख्या पार केली आहे. बाधितांची संख्या ९०१ झाली आहे. ८४४ बरे झाले आहेत. १० जण उपचार घेत आहेत. एक घरीच उपचार घेत आहे. ४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, असे डॉ. सारोक्ते यांनी सांगितले.

Web Title: 3 corona positive at Tejewadi in Ootur area