ओतूर परिसरात ३ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:11 IST2021-03-18T04:11:41+5:302021-03-18T04:11:41+5:30

ओतूर आरोग्य केंद्र कक्षेत विविध गावात कोरोनाचे पाँझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत .त्यामुळे ओतूर परिसरातील नागरिकांची चिंता वाढत आहे ...

3 corona positive in Ootur area | ओतूर परिसरात ३ कोरोना पाॅझिटिव्ह

ओतूर परिसरात ३ कोरोना पाॅझिटिव्ह

ओतूर आरोग्य केंद्र कक्षेत विविध गावात कोरोनाचे पाँझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत .त्यामुळे ओतूर परिसरातील नागरिकांची चिंता वाढत आहे .

बुधवारी ओतूर शहरात १,पाचघर १,हिवरे खुर्द १असे तीन पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे परिसरातील बाधितांची संख्या ९५९ झाली आहे.८८१बरे झाले आहेत २३ जणावर कोव्हीड सेंटरमध्ये तर ७ जण घरीच उपचार घेत आहेत. ४८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.

ओतूर शहरातील बाधितांची संख्या ४८१ झाली आहे. पैकी ४४६ बरे झाले आहेत. १० जणांवर तर १ घरीच उपचार घेत आहे. २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

पाचघर येथील ६ बाधितांपैकी ५ बरे झाले आहेत. १ जणावर उपचार सुरू केले आहेत. हिवरे खुर्द येथील बाधितांची संख्या ३७ झाली आहे, ३२ बरे झाले आहेत. ५ जण उपचार घेत आहेत .२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 3 corona positive in Ootur area