गुंडाच्या खून प्रकरणातील ३ आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:28+5:302021-07-14T04:14:28+5:30
कुख्यात गुंड पप्पू ऊर्फ राहुल कल्याण वाडेकर याचा रविवारी (दि.१२) रात्री निर्घृणपणे खून झाला. मयत पप्पू वाडेकर याचा भाऊ ...

गुंडाच्या खून प्रकरणातील ३ आरोपी जेरबंद
कुख्यात गुंड पप्पू ऊर्फ राहुल कल्याण वाडेकर याचा रविवारी (दि.१२) रात्री निर्घृणपणे खून झाला. मयत पप्पू वाडेकर याचा भाऊ अतुल कल्याण वाडेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात सर्वांविरोधात फिर्याद नोंदविली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक, अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना योग्य त्या सूचना केल्या. अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांचे मागदर्शनाखाली तपास पथक नेमण्यास सांगितले होते. तपास पथकाने सापळा रचून बंटी ऊर्फ विजय विठ्ठल जगदाळे यास राजगुरुनगर शहरातून ताब्यात घेतले. त्याच्यासोबत आणखी एक युवक मिळून आला. त्याचे नाव जितेंद्र पंढरीनाथ गोपाळे (वय ३१, रा. तिन्हेवाडी रोड, राजगुरुनगर) असे आहे. दरम्यान, बंटी ऊर्फ विजय जगदाळे याच्याकडे चौकशी केली असता, जितेंद्र गोपाळे हा देखील गुन्हा करते वेळी सोबत होता. दरम्यान, या गुन्ह्यांचा मुख्य सूत्रधार मिलिंद विठ्ठल जगदाळे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाडेकर खून प्रकरणातील पोलिसांनी ३ आरोपी जेरबंद केले आहे.