शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

११ मार्चला दुसरा पीएमपीचा बस डे ;१८०० बस असणार मार्गावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 19:59 IST

विक्रमी बस मार्गावर आणून प्रवाशांना सुखद धक्का देणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचा दुसरा बस डे संत तुकाराम बीज म्हणजे दि. ११ मार्च रोजी होणार आहे. या दिवशीही १८०० हून अधिक बस मार्गावर आणून २ कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प पीएमपी प्रशासनाने केला आहे.

पुणे : विक्रमी बस मार्गावर आणून प्रवाशांना सुखद धक्का देणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचा दुसरा बस डे संत तुकाराम बीज म्हणजे दि. ११ मार्च रोजी होणार आहे. या दिवशीही १८०० हून अधिक बस मार्गावर आणून २ कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प पीएमपी प्रशासनाने केला आहे. प्रत्येक महिन्यातील एका दिवशी बस डे साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ‘पीएमपी’च्या पहिल्यावहिल्या बस डे दिवशी (दि. १० फेब्रुवारी) प्रशासनाने विक्रमी १८३३ बस मार्गावर आणल्या होत्या. आतापर्यंतच्या पीएमपीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या बस मार्गावर धावल्या. या बस डे बाबत प्रशासनाकडून पुरेशी प्रसिध्दी करण्यात आली नव्हती. त्यामुळे हा बस डे प्रवाशांसाठी सुखद धक्का देणारा ठरला. यादिवशी बससंख्या वाढण्याबरोबरच प्रवासी संख्या तसेच उत्पन्नातही वाढ झाली. पीएमपीने दोन कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठरविले होते. पण १ कोटी ८३ लाख रुपये उत्पन्नावर समाधान मिळाले. अपेक्षित उत्पन्न मिळाले नसले तरी अधिक बस मार्गावर आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला होता. पीएमपीच्या ताफ्यात सध्या सुमारे २ हजार बस आहेत. सध्या मार्गावर १५५० ते १६०० बस येतात. बस डे दिवशी चालक-वाहकांच्या सुट्टया रद्द करून अधिक बस मार्गावर आणण्यात आल्या होत्या.

या दिवशी १८०० हून अधिक बस मार्गावर आणल्या जाणार आहेत. प्रमुख मार्गांवर दर पाच मिनीटाला बस सोडण्याचे नियोजन आहे. सकाळी  ८ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ९ या गर्दीच्या वेळी २०० जादा शटल बसेस सोडण्यात येणार आहेत. मुख्य स्थानकांवर आगार प्रमुख व सहाय्यक यांचेकडून प्रवाशांचे स्वागत व मार्गदर्शन केले जाईल. मुख्य बसथांब्यांवर चेकर तसेच बीआरटी मार्गावर फिल्ड आँफिस प्रवाशांनामाहिती देतील. स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी लाऊड स्पीकरवर उदघोषणा केली जाणार आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतुक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. पुणे प्रदूषणमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी वैयक्तिक खासगी वाहन न वापरता सार्वजनिक वाहतूकीचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.  

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलTrafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा