२८ टँकरने पाणीपुरवठा
By Admin | Updated: May 26, 2015 23:18 IST2015-05-26T23:18:59+5:302015-05-26T23:18:59+5:30
जिल्ह्यात २८ टँकरने २७ गावे व १४८ वाड्यांना सुमारे ४८ हजार ९१३ लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला ३४ टँकरने ६३ हजार ४0५ लोकसंख्येला पाणीपुरवठा होत होता.

२८ टँकरने पाणीपुरवठा
पुणे : जिल्ह्यात २८ टँकरने २७ गावे व १४८ वाड्यांना सुमारे ४८ हजार ९१३ लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला ३४ टँकरने ६३ हजार ४0५ लोकसंख्येला पाणीपुरवठा होत होता.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आजच्या तारखेला ६ टँकर कमी आहेत. यात बारामतीत सर्वाधिक ८ टँकर सुरू असून, गेल्या महिनाभरापासून ही संख्या स्थिर आहे. त्या पाठोपाठ पुरंदर तालुक्यात ५ टँकर सुरू आहेत.
२८पैकी शासकीय टँकर २४ तर खासगी टँकर ४ आहेत. २ पिकव्हॅनद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, तो भोर तालुक्यात आहे. प्रशासनाने १७ विहिरी व २ खासगी बोअरचे अधिग्रहण केले आहे. (प्रतिनीधी)
आंबेगाव : २ (४)
बारामती : ८ (८)
भोर : ३ (४)
दौंड : २ (0)
हवेली : २ (५)
इंदापूर : 0 (२)
जुन्नर : 0 (१)
खेड : ३ (४)
पुरंदर : ५ (२)
शिरूर : १ (0)
वेल्हा : २ (४)
४जिल्ह्यात यंदा इंदापूर, मुळशी, मावळ, जुन्नरला टँकर नाहीत.
४गेल्या वर्षी दौंडला एकही टँकर नव्हता.
यंदा २ टँकर, तर शिरूरला एकही टँकर नव्हता, यंदा १ टँकर.
४गेल्या वर्षी पुरंदरला फक्त २ टँकर होते,
यंदा ५ टँकर सुरू.
४गेल्या वर्षी हवेलीत ५ टँकर होते, यंदा दोनच.