भिगवण येथील २७३ मिलिमीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST2021-07-15T04:09:23+5:302021-07-15T04:09:23+5:30
सलग दोनतीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे भिगवण आणि परिसरात दिलासादायक वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चालू मोसमातील ...

भिगवण येथील २७३ मिलिमीटर
सलग दोनतीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे भिगवण आणि परिसरात दिलासादायक वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चालू मोसमातील २७३.९० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती महाबँक ग्रामीण विकास केंद्राचे देविदास फलफले यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भाग हा नेहमी पावसाच्या प्रमाणात दुष्काळी म्हणून गणला जातो. या भागात सरासरी ४२० मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात येते. तर २०१२ साली २८८.२० इतक्या नीचांकी पावसाची नोंद करण्यात आली होती.२०१० साली ६७७.२५ इतक्या विक्रमी पावसाची नोंद होती २०१९ रोजी झालेल्या पावसाने सर्व विक्रम मोडीत ६८८.२० इतक्या पावसाची विक्रमी नोंद केली होती.हा विक्रम मोडीत २०२० साली झालेल्या अतिवृष्टी पावसाने ९९० .२१ मिलिमीटर पावसाची नोंद करून विक्रम प्रस्थापित केला आहे.यावर्षी सुरुवातीच्या मोसमातच २८८.२० मीटर इतका पाऊस नोंदविला गेला आहे.त्यामुळे यावर्षी पाऊस कोणता विक्रम करतो हे पाहण्यासाठी बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले असल्याचे दिसून येत आहे.