शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

कृषी विभागाच्या डीबीटीसाठी २७ हजार अर्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 20:29 IST

वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना शेतीची औजारे आणि साहित्य देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक प्रतिसाद : कडबाकुट्टी यंत्राला सर्वाधिक मागणीजिल्हा परिषदेतर्फे शेतकऱ्यांसाठी डीबीटी योजनेंतर्गत विविध साहित्यांचे वाटप करण्यात येणार

पुणे : कृषी विभागाकडून ७५ टक्के अनुदानावर मिळणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत शेती औजारे आणि साहित्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २७  हजार ६२७ शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केले आहेत. यात कडबाकुट्टी यंत्राला सर्वाधिक मागणी असून, जवळपास ५ हजार ४५३ जणांनी यासाठी अर्ज केल्याची माहिती कृषी आणि पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली.  वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना शेतीची औजारे आणि साहित्य देण्यात येणार आहे. या योजनेबाबत विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे  यावर्षी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षी जवळपास  २७  हजार ६२७ लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले. जुन्नर तालुक्यातून ४ हजार ५३२ अर्ज आले आहेत. बारामती येथून ३ हजार ५५१ अर्ज, खेड तालुक्यातून तीन हजार, तर शिरूर तालुक्यातून ३ हजार १७८ अर्ज आले आहेत, आंबेगाव तालुक्यातून २  हजार ३९, दौंड तालुक्यातून २ हजार ५२१, इंदापूर तालुक्यातून २  हजार २१४, भोर तालुक्यातून १ हजार ८३७, पुरंदर तालुक्यातून १ हजार ५६५, हवेली तालुक्यातून १  हजार ९३ अर्ज आले आहेत. सर्वात कमी अर्ज हे वेल्हा तालुक्यातून ३९१ आणि मुळशी येथून ४२५ अर्ज, तर मावळ येथून ५८१ अर्ज आले आहेत.    ............जिल्हा परिषदेतर्फे शेतकऱ्यांसाठी डीबीटी योजनेंतर्गत विविध साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकाला लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. सुनील खैरनार उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ......................या योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहून जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते आणि कृषी विभागाच्या सभापती सुजाता पवार यांनी मूळ निधीमध्ये १३ लाखांच्या वाढीव निधीची तरतूद केली आहे. एकूण ५ कोटी ५२ लाख ९० हजार रुपये इतक्या निधीची तरतूद आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजना राबविण्यात येत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीFarmerशेतकरीGovernmentसरकार