शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

केळद खिंडीत बस दरीत कोसळून २७ पर्यटक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 15:10 IST

पर्यटक संध्याकाळी वेल्ह्याकडे येत असताना मुसळधार पाऊस असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस ५० फूट दरीत कोसळली.

ठळक मुद्दे सुदैवाने एका झाडाला बस अडकल्याने खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. या झाडामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. 

वेल्हे : तोरणा किल्ल्याच्या पलीकडील मढेघाट धबधब्यावर भिजण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची बस केळद खिंडीमध्ये उलटली. या अपघातात २७ पर्यटक जखमी झाले. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोमवारी ( दि. २५ जून ) रात्री आठच्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक पुण्याहून मढेघाटामध्ये गेले होते. मिनीबस घेऊन गेलेले हे सर्व पर्यटक संध्याकाळी वेल्ह्याकडे परतत होते. केळद खिंडीमधून येत असताना बसचे ब्रेक निकामी झाले. मुसळधार पाऊस असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस ५० फूट दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने एका झाडाला अडकल्याने खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. या झाडामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. खिंडीत बस कोसळताच पाठीमागून येणा-या अश्विन ब्रम्हे यांनी ही आरडाओरडा ऐकून आपली गाडी थांबवली. सोबत असलेल्या सहका-यांना घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. यावेळी शेजारच्या गावातील पिंटू शिळीमकर व समीर शिळीमकर हे सुद्धा मदतीला धावले. अंधारात आणि भर पावसात जखमी पर्यटकांना ब्रम्हे यांनी बाहेर काढून स्वत:च्या वाहनातून व अन्य खाजगी वाहनांमधून वेल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र खूळे यांना संपर्क साधून उपचारासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगितले. जखमींवर प्रथमोपचार केल्यानंतर चालक तुषार येनपुरे व डॉ. बोरसे यांनी १०८ रुग्णवाहिकेतून  त्यांना पुण्यामध्ये हलविण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात