कमला नेहरू रुग्णालयात 27 मशिन्स बंद
By Admin | Updated: November 13, 2014 00:15 IST2014-11-13T00:15:52+5:302014-11-13T00:15:52+5:30
महापालिकेचे कमला नेहरू रूग्णालय हे शहरातील एकमेव अद्ययावत रुग्णालय आहे.

कमला नेहरू रुग्णालयात 27 मशिन्स बंद
पुणो : महापालिकेचे कमला नेहरू रूग्णालय हे शहरातील एकमेव अद्ययावत रुग्णालय आहे. मात्र, येथील 27 मशिन्स दुरुस्ती आणि देखभालीअभावी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यातील काही मशिन्स अत्यंत महत्त्वाच्या असून, या बंद यंत्रणोचा फटका रुग्णांना बसत आहे. यासंदर्भात, महापालिका आयुक्तांनी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.
लोकहित फाउंडेशनचे अजहर अहमद खान यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीवरून ही बाब उघडकीस आली आहे. कमला नेहरू रूग्णालयात स्त्रीरोग, अस्थिरोग, मानसिक आजार, बालरोग, नाक-नाक-घसा, डोळे यासंबंधीचे उपचार केले जातात. महापालिकेचे शहरातील हे एक महत्त्वाचे रूग्णालय असून याठिकाणी रोज अनेक रूग्ण उपचारांसाठी येत असतात. रूग्णांवरील उपचारांसाठी या ठिकाणी नेब्युलायझर, व्हेंटिलेटर, डॉपलर, स्कॅन, लेसर, ईसीजी, लॅप्रोस्कोप, वॉर्मर, सोनोग्राफी, रेफ्रि जरेटर, इनक्युबटर यंसह विविध प्रकारच्या सुमारे 277 मशिन्स आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून वॉटर प्युरिफिकेशन सिस्टम, ‘सेंट्रीफ्युज’, ‘मॅमोग्राफी’, ‘सोनोग्राफी’, ‘लॅप्रोस्कोप’, सक्शन, ‘मल्टिपर मॉनिटर’, ‘वॉर्मर’ अशा महत्त्वाच्या यंत्रणा अनेक दिवसांपासून बंद आहेत. (प्रतिनिधी)
टेक्निशियन भरती कधी?
4महापालिकेकडून नगरसेवकांसह कर्मचा:यांना आरोग्याच्या सोयी-सवलती देण्यात येतात. नगरसेवकांच्या आरोग्यावर कोटय़वधींची उधळण होते.
4यातील ईसीजी मशिन चार महिन्यांपासून बंद आहे. मात्र, हृदयरूग्णांसाठी आवश्यक असणारे ईसीजी मशिन बसविण्यासाठी
क ोणीही आवाज उठविलेला नाही.
4टेक्निशियन नसल्यामुळे हे मशिन बंद आहे. महापालिका आयुक्त याची दखल घेणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.