जिल्हा परिषदेसाठी २७ लाख मतदार
By Admin | Updated: January 23, 2017 02:57 IST2017-01-23T02:57:58+5:302017-01-23T02:57:58+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शनिवारी (दि. २१) प्रसिद्ध करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यात

जिल्हा परिषदेसाठी २७ लाख मतदार
पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शनिवारी (दि. २१) प्रसिद्ध करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यात सुमारे २७ लाख ४९ हजार १६९ मतदार निवडणुकीसाठी आपला हक्क बजावणार आहेत.
जिल्हा परिषदेसाठी ७५ गट तर १३ पंचायत समित्यांमध्ये १५० गणांसाठी ही निवडणूक होत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सन २०११ची लोकसंख्या गृहीत धरून गट-गणांची फेररचना करण्यात आली. जिल्ह्यात दहा वर्षांत लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने गट-गणांच्या रचनेत म्बदल करण्यात आले. गटांची संख्या ७५ च ठेवण्यात आली असली तरी तालुकास्तरावर गटांच्या संख्येत फेरबदल करण्यात आले. एकट्या हवेलीत तीन गटांची भर पडली. शिरूर तालुक्यामध्ये नव्याने एक गट वाढविण्यात आला. जुन्नर, भोर, दौंड व इंदापूर तालुक्यातील प्रत्येक एक गट कमी झाला आहे. गट-गणनिहाय मतदारयाद्या फोडण्यात आल्या.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष मतदार नावनोंदणी मोहीम घेऊन तयार केलेल्या मतदार याद्याच जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालिका निवडणुकासाठी वापरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. जिल्हा निवडणूक कार्यालयाने गट-गणानुसार प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविल्या. (प्रतिनिधी)