पालिकेच्या १६२ जागांसाठी २६६१ अर्ज

By Admin | Updated: February 4, 2017 04:19 IST2017-02-04T04:19:36+5:302017-02-04T04:19:36+5:30

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील १४ निवडणूक कार्यालयातून एका दिवसात विक्रमी २२१५ अर्ज दाखल झाले असून, आतापर्यंत

2661 applications for 162 seats in the Municipal Corporation | पालिकेच्या १६२ जागांसाठी २६६१ अर्ज

पालिकेच्या १६२ जागांसाठी २६६१ अर्ज

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील १४ निवडणूक कार्यालयातून एका दिवसात विक्रमी २२१५ अर्ज दाखल झाले असून, आतापर्यंत जमा झालेल्या एकूण अर्जांची संख्या २६६१वर पोहोचली आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून यादी जाहीर न करता अर्ज शुक्रवारी सकाळी थेट उमेदवारांना बोलावून ए व बी फॉर्म देण्यात आले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी धांदल उडाली. सर्वच निवडणूक कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळलेली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी अकरापासून होती, मात्र सकाळी आठ वाजल्यापासूनच निवडणूक अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर उमेदवारांनी रांग लावली होती.
अर्ज भरण्याची मुदत ३ वाजता संपली, त्यावेळी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची रांग कायम होती. घोले रोड, भवानी पेठ, धनकवडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये रात्री उशिरापर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. सर्वच पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्षांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)

चिन्ह व केंद्रनिहाय मतदार यादी ८ फेब्रुवारीला
अपक्ष व छोट्या पक्षांच्या उमेदवारांना ८ फेब्रुवारी रोजी चिन्हांचे वाटप केले
जाणार आहे. तसेच या दिवशी
मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या
प्रसिद्ध होणार आहेत.
त्यामुळे मतदारांना कोणत्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावयाचे आहे, याची स्पष्टता येणार आहे. त्यानंतर २१ फेब्रुवारीला मतदान आणि २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

आज छाननी, तर मंगळवारी अर्ज माघारी
महापालिका निवडणुकीसाठी आठवडाभर सुरू असलेली उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली. आज ४ फेब्रुवारी रोजी (शनिवारी) अर्जांची छाननी होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी (मंगळवारी) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

शेवटच्या दिवशीच प्रतिसाद
शुक्रवारी औंध निवडणूक कार्यालयात ९६, घोले रोड १८२, सहकारनगरमध्ये २२०, कोथरूड १११, बिबवेवाडीमध्ये १२०, हडपसरमध्ये १४४, नगररोड १९२, भवानी पेठ
२२६, वारजे कर्वेनगर १५७, येरवडा २३१,
भवानी पेठ १८९, टिळक रोड १३९, कोंढवा
११८ अर्ज जमा झाले आहेत. शेवटच्या दिवशी सर्वाधिक २२० अर्ज सहकारनगर येथे, तर सर्वांत कमी अर्ज ९६ अर्ज औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये दाखल झाले. औंध निवडणूक कार्यालयामध्ये गुरुवारी खूप अर्ज दाखल झाले असल्याने शुक्रवारी अर्ज कमी आले.
महापालिका निवडणुकांसाठी दि.२७ जानेवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिले ६ दिवस अर्ज भरण्यास काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिल्यानंतर मात्र इच्छुक उमेदवारांची धावपळ उडालेली आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाली नसतानाही काही विद्यमान नगरसेवकांसह अनेक इच्छुक उमेदवारांनी राजकीय पक्षांच्या नावाने अर्ज भरले होते. त्यांनी ए व बी फॉर्म शुक्रवारी जमा केले. उर्वरित बहुसंख्य उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज भरले.
3उमेदवारांनी एका प्रभागात एक पेक्षा अधिक अर्ज दाखल केले असले, तरी त्या उमेदवाराला त्या प्रभागातून एकाच जागेवर निवडणूक लढविता येणार आहे, त्यापेक्षा जास्त अर्ज भरले असतील, तर माघार घ्यावी लागणार आहे.

Web Title: 2661 applications for 162 seats in the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.