इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी २६५ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:05+5:302021-03-15T04:11:05+5:30
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले २५ रस्ते व १० पूल बांधण्यासाठी राज्यशासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून २६४ कोटी ...

इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी २६५ कोटींचा निधी
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले २५ रस्ते व १० पूल बांधण्यासाठी राज्यशासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून २६४ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पात इंदापूर तालुक्यासाठी लक्षणीय आर्थिक तरतूद करून घेतली आहे. या अर्थसंकल्पात रस्ते, पाणी, पूल, बंधारे व इतर विकासकामांसाठी जवळपास २ हजार कोटींची भरीव तरतूद करत असताना तालुक्यातील अतिमहत्त्वाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. तालुक्यातील हॅप्पी इंडिया कंपनी ते गोसावीवाडी ते विठ्ठलवाडी रस्ता ( ७ कोटी ५० लाख ), लासुर्णे ते चिखली रस्ता ( १ कोटी २० लाख ), अंथूर्णे ते भरणेवाडी ते बिरंगुडवाडी रस्ता ( ६ कोटी ३० लाख ), कळस बिरोबा मंदिर ते राष्ट्रीय महामार्ग रस्ता ( ६ कोटी ), निंबोडी ते शेटफळगढे ते लाकडी रस्ता ( १० कोटी ४४ लाख ), मदनवाडी ते पिंपळे ते निरगुडे रस्ता ( ८ कोटी ६० लाख ), तावशी ते उद्धट ते थोरातवाडी रस्ता ( ६ कोटी ४४ लाख ), सराफवाडी ते निरवांगी ते खोरोची ते पिठेवाडी रस्ता ( ८ कोटी ५० लाख ), न्हावी ते लोणीदेवकर रस्ता ( ४ कोटी ), काटी ते रेडणी रस्ता ( ३ कोटी ), काटी ते नीरा भीमा रस्ता ( ५ कोटी ११ लाख ) रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
त्याचबरोबर शिरसोडी ते कालठण नं.२ ते गलांडवाडी रस्ता ( ५ कोटी ), रेडणी ते चाकाटी रस्ता ( ८ कोटी ), गडदेवाडी ते कौठळी रस्ता ( ५ कोटी ५० लाख ), इंदापूर ते शहा रस्ता ( २ कोटी ), लोणी ते चांडगाव रस्ता ( ४ कोटी ), पळसदेव वरकुटे ते कालठण नं. १ रस्ता ( ४ कोटी ३० लाख ), वरकुटे खुर्द ते वडापुरी ते गलांडवाडी २ ते सरडेवाडी ( ९ कोटी २ लाख ), अगोती नं.१ ते चांडगाव रस्ता ( २ कोटी ), तरंगवाडी ते गोखळी रस्ता ( २ कोटी ), आडोबावस्ती ते नरसिंहपूर रस्ता ( २ कोटी ), लाखेवाडी ते पीठेवाडी ते सराटी ते गणेशवाडी रस्ता ( ७ कोटी ) व कौठळी ते कर्मयोगी साखर कारखाना ते इंदापूर रस्ता ( ६ कोटी ) होणार आहे.
तर तालुक्यातील आशियाई विकास बँक योजनेंतर्गत बारामती भिगवण रस्त्यासाठी ४७ कोटी ३२ लाख व खडकी ते पारवडी ते शेटफळगढे ते भवानीनगर रस्त्यासाठी ६९ कोटी १३ लाखांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे.तर कळस ते लोणी रस्त्यावरील पूल बांधणे ( ३ कोटी ५० लाख ), बाभूळगाव ते भांडगाव रस्त्यावरील पुलांसाठी ( ३ कोटी ), सराफवाडी ते रेडा रस्त्यावरील पूल बांधणे ( १ कोटी ७५ लाख ), शिरसोडी ते भांडगाव रस्त्यावरील पूल बांधणे ( ३ कोटी ५० लाख ), सराफवाडी ते पिठेवाडी रस्त्यावरील पूल बांधणे ( ४ कोटी ), तरंगवाडी ते गोखळी रस्त्यावरील पूल बांधणे ( ७० लाख ), पिंपरी ते नरुटेवाडी रस्त्यावरील पूल बांधणे ( १ कोटी ), वडापुरी रेडणी रस्त्यावरील पूल बांधणे (१ कोटी ), वरकुटे खुर्द ते गलांडवाडी २ रस्त्यावरील पूल बांधणे (१ कोटी ) तर शेळगाव ते व्याहाळी रस्त्यावरील पूल बांधणे ( १ कोटी ) हि कामे होणार आहेत.
भूसंपादन व विश्रामगृहासाठी ३ कोटी ९० लाख
तालुक्यातील रेडणी बोराटवाडी ते उंबरे दहीगाव रस्त्यावरील नीरा नदीवरील पूल बांधण्याच्या कामासाठी लागणारे भूसंपादन करण्यासाठी १ कोटी ३० लाख, तर लासुर्णे येथे विश्रामगृह बांधण्यासाठी २ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.