शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

ससूनमधील २६ डॉक्टर्स केरळवासियांच्या सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 20:40 IST

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील ५५ व ससूनमधील २६ असे एकूण ८१ डॉक्टरांची टीम मंगळवारी विमानाने केरळमध्ये दाखल

ठळक मुद्देपुरग्रस्तांची आरोग्य तपासणी : महापुराच्या तडाख्यानंतर रोगराई पसरण्याची भीतीमहापुराच्या जोरदार तडाख्यानंतर आता केरळमध्ये रोगराई पसरण्याची भीती व्यक्त पुरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी पुण्यातून १८ डब्यांची रेल्वेगाडी सोमवारी केरळला रवाना

पुणे : पुरग्रस्तांना आरोग्य सेवा देण्यासाठी ससून रुग्णालयातील २६ डॉक्टर्स सोमवारी केरळला रवाना झाले. त्यांच्याकडून केरळच्या पुरग्रस्तांची आरोग्य तपासणी तसेच उपचार केले जाणार आहेत. महापुराच्या जोरदार तडाख्यानंतर आता केरळमध्ये रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर कमी झाला असून पुराचे पाणीही ओसरू लागले आहे. पुरामुळे सर्वत्र गाळ, कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने विविध संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका आहे. सर्व पुरग्रस्तांना विविध ठिकाणी छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर देशभरातून शेकडो डॉक्टर्स केरळला रवाना झाले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील डॉक्टरांचाही समावेश आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील ५५ व ससूनमधील २६ असे एकूण ८१ डॉक्टरांची टीम मंगळवारी विमानाने केरळमध्ये दाखल झाले. ससूनच्या टीममध्ये मेडिसिन, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, रोगप्रतिबंधक  या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. केरळमध्ये सुमारे ९ लाख नागरिकांना विविध छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथील एका छावणीमध्ये हे डॉक्टर रुग्णांची सेवा करतील. पुढील तीन-चार दिवसांत ससून व जे.जे. रुग्णालयातील आणखी सुमारे १०० डॉक्टरांची टीम केरळला रवाना केली जाऊ शकते, अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली. ----------------रेल्वेगाडी केरळला रवानापुरग्रस्त भागात अडकलेल्या केरळमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी पुण्यातून १८ डब्यांची रेल्वेगाडी सोमवारी पहाटे ३ वाजता केरळला रवाना झाली. नागरिकांची संख्या जास्त असल्याने देशाच्या विविध भागातून रिकाम्या रेल्वेगाड्या केरळमध्ये पाठविण्यात येत आहे. या सर्व गाड्यांमधून तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येईल. दक्षिण रेल्वेकडून या गाड्यांचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेKeralaकेरळsasoon hospitalससून हॉस्पिटलJ. J. Hospitalजे. जे. रुग्णालयdocterडॉक्टर