शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी भाड्याने आणलेले २६ लाख ६० हजारांचे कॅमेरे परस्पर ठेवले गहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 20:02 IST

महागडे कॅमेरे परस्पर गहाण ठेवत त्यातून मिळालेल्या पैशांतून प्रेयसीचे दुचाकी घेवून तिचे लाड पुर्ण करणा-या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देआरोपी फोटोग्राफर असून त्याचे चार महिन्यांपुर्वी एका मुलीशी प्रेमसंबंध निर्माणकॅमे-याचे दिवसाला १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपये भाडेवेळेत कॅमेरे परत न केल्यामुळे हा प्रकार उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाड्याने आणलेले महागडे कॅमेरे परस्पर गहाण ठेवून त्यातून मिळालेल्या पैशांतून प्रेयसीचे दुचाकी घेवून तिचे लाड पुर्ण करणा-या प्रियकराला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून २६ लाख ६० हजार रुपये किंमतीचे दहा ५ डी कॅमेरे, ५ लेन्स जप्त करण्यात आल्या आहेत.आकाश पांडुरंग भिसे (वय २२, हमालनगर, मार्केटयार्ड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस स्टेशनचे तपास पथक गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली, एक तरुण केंजळे चौकात आला असून त्याच्याकडे चोरी केलेला महागडा कॅमेरा आहे.पोलीस नाईक विकास बो-हाडे व शंकर कुंभार यांना मिळालेल्या या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, कर्मचारी बापूसाहेब खुटवड, केदार आढाव, शंकर कुंभार, सयाजी चव्हाण यांच्यासह पथकाने सापळा लावून भिसे याला कॅमे-यासह ताब्यात घेतले.         भिसे हा फोटोग्राफर असून त्याचे चार महिन्यांपुर्वी एका मुलीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र तिचे लाड पुरविण्यासाठी भिसे यांच्याकडे पुसेरे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने लग्नाच्या शुटींगच्या आॅर्डर मिळाल्या असल्याचे सांगून शहरातील वेगवेगळ्या फोटोग्राफरकडून महागडे कॅमेरे भाड्याने घेतले. कॅमे-याचे दिवसाला १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपये भाडे ठरले होते. मात्र प्रत्यक्षात कॅमे-यांचा शुटिंगसाठी वापर न करता त्याने ते सर्व कॅमेरे गहाण ठेवून काही पैसे उसने घेतले. या पैश्यातून प्रेयसीला एक स्कूटी घेऊन दिली. तर उर्वरीत पैशांतून तिच्यासाठी सोन्याचे दागिने घेतले. तसेच महागड्या हॉटेलमध्ये जेवणासाठी घेवून जात प्रेयसीचे लाड पुरविले. वेळेत कॅमेरे परत न केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस