अडीच हजार टन कचरा पडून
By Admin | Updated: August 8, 2014 23:37 IST2014-08-08T23:37:21+5:302014-08-08T23:37:21+5:30
येथील कचरा डेपोवर वाहने येऊ देण्यास ग्रामस्थांनी बंदी घातल्याने शहरातील कच:याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

अडीच हजार टन कचरा पडून
>उरुळी देवाची : येथील कचरा डेपोवर वाहने येऊ देण्यास ग्रामस्थांनी बंदी घातल्याने शहरातील कच:याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. आज दिवसभरात निर्माण झालेल्या कच:यातील केवळ 6क्क् टन कचराच पालिकेस प्रक्रियेसाठी उचलणो शक्य झाल्याने शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुमारे अडीच हजार टन कचरा पडून असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, या कच:याने कचरापेटय़ा ओसांडून वाहत असून, अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर येण्यास सुरुवात झालेली आहे.
महापालिकेकडून शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांवर आज सुमारे 6क्क् टन कचरा नेण्यात आला. त्यानंतरचा उर्वरित कचरा शहरातच पडून आहे. नागरिकांकडून महापालिकेने आवाहन करूनही मोठय़ा प्रमाणात कचरा कुंडय़ांमध्ये टाकला जात असल्याने मध्यवस्तीसह काही उपनगरांमधील कचराकुंडय़ा आज ओसांडून वाहत होत्या. काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात हा कचरा रस्त्यावरच आला होता. तसेच, आज दुपारी शहरात पुन्हा पाऊस झाल्याने हा कचरा भिजून काही ठिकाणी दरुगधी पसरण्यासही सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)
ओल्या कच:याने
समस्या वाढली
दरम्यान, शहरातील कचरा उचलने बंद असल्याने अनेक नागरिक; तसेच हॉटेलचालकांकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कचरापेटय़ांमध्ये ओला कचरा टाकला जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हा कचरा रस्त्यावरच टाकला गेला आहे. परिणामी आज दिवसभर या कुंडय़ांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर व वाहतुकीस अडथळेही निर्माण झाले असल्याचे दिसून आले.