एसआरएची २५०० घरे पडून
By Admin | Updated: November 23, 2015 00:40 IST2015-11-23T00:40:52+5:302015-11-23T00:40:52+5:30
झोपडपटट्ी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) शहरामध्ये उभारण्यात आलेल्या ५ हजार घरांपैकी अडीच हजार घरे एसआरएकडे पडून असल्याची माहिती उजेडात आली आहे.
एसआरएची २५०० घरे पडून
पुणे : झोपडपटट्ी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) शहरामध्ये उभारण्यात आलेल्या ५ हजार घरांपैकी अडीच हजार घरे एसआरएकडे पडून असल्याची माहिती उजेडात आली आहे. कोट्यवधी रूपयांचा टीडीआर देऊन राबविलेल्या या योजना लाभार्थींपर्यंत पोहचण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे शहरामध्ये साडे पाचशे झोपडपटट्या आहेत. या झोपडपटटयांमध्ये एसआरए योजना राबविल्यास मोठयाप्रमाणात घरे निर्माण होऊ शकतील. शहरामध्ये आतापर्यंत ६९ एसआए प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून त्यातून १६ हजार २३२ घरे उपलब्ध होणार आहेत, त्यापैकी ५ हजार घरे तयार आहेत.
त्यातील २ हजार २२० घरांचे लाभार्थींना वाटप करण्यात आले आहे. एसआरए योजनेअंतर्गत १
हजार ८०० कोटी रूपयांचा टीडीआर महापालिकेकडून बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आला
आहे. मात्र एसआरएकडून पालिकेला केवळ २०० घरांचाच ताबा मिळाल्याची माहिती उजेडात आली आहे. (प्रतिनिधी)