आळेफाटा उपबाजारात कांद्यास दहा किलोस २५० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST2021-06-19T04:07:53+5:302021-06-19T04:07:53+5:30

आळेफाटा उपबाजारात आज शुक्रवारी (दि. १८) झालेल्या कांदा लिलावात चांगल्या कांद्यास दहा किलोस २५० असा दर मिळाला असल्याचे सभापती ...

250 per 10 kg of onion in Alephata sub-market | आळेफाटा उपबाजारात कांद्यास दहा किलोस २५० रुपये

आळेफाटा उपबाजारात कांद्यास दहा किलोस २५० रुपये

आळेफाटा उपबाजारात आज शुक्रवारी (दि. १८) झालेल्या कांदा लिलावात चांगल्या कांद्यास दहा किलोस २५० असा दर मिळाला असल्याचे सभापती संजय काळे उपसभापती दिलीप डुंबरे यांनी सांगितले.

आळेफाटा उपबाजारात मागील मंगळवार, रविवारी व शुक्रवारी झालेल्या कांदा लिलावात चांगल्या प्रतीच्या एक नंबर गोळा कांद्यास प्रति दहा किलो २५० असे दर मिळाले होते. आजही पुन्हा हे दर दहा किलोस स्थिर राहिले.

पावसाळी दिवसातही येथील आवक चांगली होत आहे. आज शुक्रवारी १५ हजार चारशे कांदा गोणी विक्रीस आल्या असल्याचे बाजार समिती सचिव रूपेश कवडे यांनी सांगितले.

प्रतवारीप्रमाणे प्रती दहा किलो मिळालेले आजचे दर असे एक नंबर कांदा २२० ते २५० रूपये दोन नंबर कांदा १७० ते २२० रूपये तीन नंबर कांदा ९० ते १७० रूपये.

आळेफाटा उपबाजारातील कांदा लिलाव.

Web Title: 250 per 10 kg of onion in Alephata sub-market