शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उजनी धरणात अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 02:20 IST

पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली धनदांडग्यांचे मळे फुलविण्याचे काम सुरू

- सुरेश पिसाळ भिगवण : उजनी धरणातून सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडल्याने पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे. अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे उजनीकाठचे शेतकरी, तसेच नागरिकांचा पाणीप्रश्न येत्या काळात गंभीर होण्याची शक्यता आहे. पाण्याच्या जिवावर शेतातील पिकासाठी काढलेली लाखोंची कर्जे माफ होत नसल्याने बळीराजासमोर संकटे ‘आ’वासून उभी आहेत.या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने आधीच अडचणीत आलेली शेती आता पाण्याच्या संकटात सापडणार आहे. त्याची धास्ती शेतकरीवर्गाला पडली आहे. दररोज पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने पाणीसाठ्याची भीषण स्थिती निर्माण होणार आहे.गतवर्षी खडकवासला धरणसाखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा उजनी धरण शंभर टक्के भरले होते. मात्र, पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन न झाल्याने जानेवारीतच पाण्याचे संकट गडद झाले आहे. दुष्काळाचा सगळ्यात मोठा फटका उजनी धरण परिसरातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. ज्यांनी धरण उभारणीसाठी गावेच्या गावे आणि उभे संसार पाण्याखाली घालवले, त्यांनाही पीके जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. डोळ्यांसमोरून धरणातील पाणी लांब-लांब जाताना दिसत आहे. पण, धरणग्रस्त शेतकरी पाण्यासाठी तडफडत आहे.सध्या धरणातील पाणी मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्यासाठी सोलापूर शहर आणि परिसरासाठी सोडले आहे. जलाशयातील पाणीसाठा कमालीचा खालावल्याने या हजारो शेतकºयांना आपली पिके वाचविण्यासाठी आता धडपड करावी लागत आहे. तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी योजना आजच्या घडीला संकटात आल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.धरण प्राधिकरणाची निर्मिती गरजेचीउजनी धरणावर पुणे, सोलापूर, नगरसह उस्मानाबाद जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीसह औद्योगिक कारखानदारांचे भवितव्य अवलंबून आहे. पाण्याचे दरवर्षी योग्य नियोजनहोत नसल्याने अनेक दिवसांपासून उजनी धरण प्राधिकरण नियामक मंडळाची निर्मितीची मागणी आता जोर धरूलागली आहे.वाद उफाळून येण्याची शक्यता...सोलापूरला पिण्याच्या नावाखाली लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी होत असल्याने धरणग्रस्त शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. आता आगामी निवडणुकांच्या तोंडावर सोलापूर आणि धरणग्रस्त शेतकरी वाद उफाळून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई