दुर्बल, वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाइन प्रवेशास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST2021-07-26T04:08:55+5:302021-07-26T04:08:55+5:30
पुणे : चालू शैक्षणिक वर्षामध्ये आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी निवड यादीतील बालकांचे प्रवेश पालकांनी शाळेत जाऊन घेण्याची मुदत ३१ ...

दुर्बल, वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाइन प्रवेशास मुदतवाढ
पुणे : चालू शैक्षणिक वर्षामध्ये आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी निवड यादीतील बालकांचे प्रवेश पालकांनी शाळेत जाऊन घेण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी घेतला आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनयम २००९ नुसार हे प्रवेश करण्यात येतात. मात्र, गटशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या स्तरावरून निवड यादीतील बालकांचे ऑनलाइन प्रवेश निश्चित झाले नाहीत. त्यामुळे निवड यादीतील बालकांना प्रवेश घेण्याकरिता आणि गटशिक्षणाधिकारी यांना ऑनलाइन प्रवेश निश्चित करण्यासाठी ही मुदतवाढ दिली असल्याचे टेमकर यांनी सांगितले आहे.
ज्या पालकांनी अजूनही शाळांमध्ये प्रवेशासाठी चौकशी अथवा शाळेत गेले नाहीत. तसेच ज्या पालकांना अजूनही लॉटरी लागल्याचे कळालेले नाही. आपआपल्या स्तरावरून त्या सर्वांना एसएमएसद्वारे माहिती देण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिनकर टेमकर यांनी दिले आहेत.
सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी निवड यादीतील बालकांचे प्रवेश पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत याआधी २३ जुलैपर्यंत होती.