पिकअप पलटी २५ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:08 IST2021-07-12T04:08:22+5:302021-07-12T04:08:22+5:30
मुथाळणे ( ता.जुन्नर ) गावाच्या हद्दीत पिकअपचा अपघात होऊन सुमारे २५ जण जखमी झाले आहेत. त्यांना ओतूर प्राथमिक ...

पिकअप पलटी २५ जण जखमी
मुथाळणे ( ता.जुन्नर ) गावाच्या हद्दीत पिकअपचा अपघात होऊन सुमारे २५ जण जखमी झाले आहेत. त्यांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
वंदना भीमा दिघे यांनी अपघाताची फिर्याद ओतूर पोलीस ठाण्यात दिली आहे अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली. मांडवी नदीच्या पुलावरून पुढे चढाला पिकअप पुढे न जाता मागे सरकू लागली, मागे येऊन तिरकस होऊन कलंडली. पडलेल्या प्रवाशांना मुक्का मार बसून त्यातील काही जण किरकोळ जखमी झाले. तपास सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तळपाडे करीत आहेत.