शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

इंदापुर तालुक्यात गायीच्या पोटात निघाल्या तब्बल २५ ते ३० किलो प्लास्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:36 IST

इंदापूर तालुक्यातील शहा गावी सलग ३ तास शस्त्रक्रिया करुन गायीच्या पोटातील हे प्लास्टिक बाहेर काढले.

ठळक मुद्देजनावरे माती,प्लास्टिक, कागद आणि कपडे खात असतील तर त्यांच्या शरीरात ‘ मिनरल्स’ची कमतरता प्लास्टिक पिशव्या गायीच्या पोटात विरघळवण्याचे कोणतेही रसायन अजूनपर्यंत नाही

बाभुळगाव :प्लास्टिकचा भस्मासूर किती भयानक होता, याचा प्रत्यय शुक्रवारी इंदापूर तालुक्यातील शहा गावी आला. येथील धनाजी इजगुडे यांच्या गाईच्या पोटात तब्बल २५ ते ३0 किलो प्लास्टिकच्या पिशव्या निघाल्या. त्यांच्या गायीवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर हा प्रकार उघडकीस आला. डॉ.लक्ष्मण आसबे यांनी सलग ३ तास शस्त्रक्रिया करुन गायीच्या पोटातील हे प्लास्टिक बाहेर काढले. शेतकरी इजगुडे यांनी काही दिवसांपूर्वीच ही गाय बाजारातून विकत आणली आहे. मात्र, ती आजारी पडली. डॉक्टरांनी गायीची तपासणी केली. यात पोटात काहीतरी असल्याची शक्यता वर्तवली होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,  गायीच्या पोटातक प्लास्टिकसारखा तत्सम पदार्थ असावा असा संशय होता. तातडीने शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. तब्बल ३ तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर तब्बल २५ ते ३० किलो प्लास्टिक पोटातून काढण्यात आले. एका मुक्या जनावराचा जीव वाचवण्याचा आनंदही आहे. शेतकऱ्यांनी आपल्या गायीची काळजी घ्यावी, जनावरे माती,प्लास्टिक, कागद आणि कपडे खात असतील तर त्यांच्या शरीरात ‘ मिनरल्स’ची कमतरता आहे, असे शेतकऱ्यांनी समाजावे. त्यासाठी मिनरल्स मिक्स्चर हे औषध जनावरांना नेहमी चारावे ,असे डॉ. आसबे म्हणाले.हा विषय आज परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागात देखील प्लास्टिक वापराचे गंभीर परिणाम अनुभवयास मिळत आहेत. अनेक जनावरांच्या पोटात प्लास्टिक पिशव्या असण्याची भीती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.............................शेतकरी आपल्या काही वस्तू कॅरीबॅगमध्ये बांधून त्या रस्त्यात टाकतात. त्यात काही वेळा शिळे अन्न असते. ते या गायीच्या तोंडाला लागल्यास ते त्या खातात. मात्र या मुळे गायींची मानसिकता अशीच होते की, प्रत्येक कॅरिबॅगमध्ये अन्नच आहे. त्या मुळे गायी कॅरिबॅगच खातात. पण गाईंनी खाल्लेली कॅरिबॅग तिच्या पोटात विरघळत नाहीत. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या शस्त्रक्रियेशिवाय निघूच शकत नाही. विशेष म्हणजे या पिशव्या गायीच्या पोटात विरघळवण्याचे कोणतेही रसायन अजूनपर्यंत तयार झाले नाही. त्यामुळे अशा वस्तु जनावरांपासून लांब टाकाव्यात. डॉ. लक्ष्मण आसबे,  पशुवैद्यकीय डॉक्टर

 

टॅग्स :IndapurइंदापूरcowगायPlastic banप्लॅस्टिक बंदीdocterडॉक्टर