पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी २३८८ अर्ज दाखल

By Admin | Updated: February 4, 2017 04:12 IST2017-02-04T04:12:27+5:302017-02-04T04:12:27+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात २३८८ अर्ज दाखल केले आहेत.

2388 nominations filed for Pimpri-Chinchwad municipal election | पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी २३८८ अर्ज दाखल

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी २३८८ अर्ज दाखल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात २३८८ अर्ज दाखल केले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. त्यासाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. उमेदवारीअर्ज दाखल करण्यासाठी दुपारी तीनपर्यंतची वेळ होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दुपारी तीननंतर प्रवेश बंद करण्यात आला. निवडणुकीसाठी शहरातील ५५०४ जणांनी उमेदवारी अर्ज आॅनलाइन भरले होते. शहरातील ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर करणाऱ्यांची गर्दी होती, तर कार्यालयाबाहेर त्यांच्याबरोबर आलेल्या समर्थकांची गर्दी होती. तीनपूर्वी कार्यालयात आलेल्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी दक्षता घेतली होती. उमेदवारीअर्जासोबतच जोडपत्र अ आणि ब देणे बंधनकारक असल्याने एबी फार्म पोहोचविण्यासाठी तारांबळ उडाली होती. (प्रतिनिधी)

- राजकीय पक्षांनी जोडपत्र अ आणि ब हे उमेदवारी अर्जासोबत जोडणे अनिवार्य असल्याने भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षांनी अ फॉर्म आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे सुपूर्त केला होता. तर जोडपत्र ब हा थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे अनिवार्य होते. त्यामुळे उमेदवारीसाठी जोडपत्र ब देण्याचा गोंधळ सायंकाळपर्यंत सुरू होता.

- गुरुवारपर्यंत ६०३ अर्ज दाखल झाले होती. आज दुपारी तीनपर्यंत १७८५ असे २३८८ उमेदवारीअर्ज दाखल झाले आहेत.

कार्यालय अर्ज
1) चिखली 252
2) इंद्रायणीनगर 159
3) अंकुशराव लांडगे सभागृह 233
4) नेहरूनगर 148
5) प्राधिकरण 248
6) हेडगेवार भवन 212
7) चिंचवड लिंक रोड 303
8) करसंकलन थेरगाव 226
9) ड प्रभाग रहाटणी 176
10) आयटीआय कासारवाडी 219
11) पीडब्ल्यू डी मैदान 212
एकूण प्रभाग 32 2388

Web Title: 2388 nominations filed for Pimpri-Chinchwad municipal election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.