शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची ग्रोथ सेंटर ठरणार १८ झोनमधील २३३ गावे; पीएमआरडीएचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 22:14 IST

पीएमआरडीए प्रत्येक गावातील पाच किलोमीटरचा विकास करणार   

पुणे : पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यात जिल्ह्यातील चारही बाजूच्या १८ झोनमधील २३३ गावांवर प्रामुख्याने फोकस केला आहे. हे १८ झोन जिल्ह्याची ग्रोथ सेंटर ठरणार आहेत. याठिकाणी मेट्रो, रिंगरोड, क्रिसेंट रेल्वे, क्रीडा विद्यापीठ, आयटी हब असे प्रामुख्याने महत्त्वाचे मोठे प्रकल्प पीएमआरडीएने प्रस्तावित केले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा ही १८ ठिकाणे ग्रोथ सेंटर ठरणार आहेत. 

पीएमआरडीएने सादर केलेल्या प्रकल्पात ४ प्रादेशिक केंद्रे, १५ नागरी केंद्रे, १२ लॉजिस्टिक केंद्रे, ५ शैक्षणिक केंद्रे, जैव विविधता उद्यान, कृषी प्रक्रिया संशोधन व विकास केंद्रे, ८ ग्रामीण सबलीकरण केंद्रे, ५९ सार्वजनिक गृह प्रकल्प, २६ नगर रचना योजना, ४ कृषि उत्पन्न बाजार केंद्रे, ५ प्रादेशिक उद्याने, ८ जैव विविधता उद्याने व १६ नागरी उद्याने, ४ अक्षय उर्जा निर्मिती केंद्रे, ३० अग्निशमन केंद्रे, २ औद्योगिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र, १ व्यवसाय केंद्र या महत्वाच्या प्रकल्पांचा देखील समावेश केला आहे.

 

---

कोठे काय होणार..

* चाकण येथे आटोमोबाईल हब आणि उपप्रादेशिक केंद्र

* आळंदी येथे नदीसुधार केंद्र

* वाघोली येथे उपप्रादेशिक केंद्र, आयटी हब

* लोणी काळभोर लाईफ सायन्स ॲन्ड स्मार्ट कृषी केंद्र

* खडकवासला येथे कम्युटर टाऊन (निवासी, व्यावसायिक व इतर सर्व प्रकल्प)

* पिरंगुट येथे नॉलेज हब

* हिंजवडी येथे उपप्रादेशिक केंद्र आणि आयटी हब

* तळेगाव येथे औद्योगिक ४.० हब

* मळवली येथे वेलनेस टुरिझम आणि शैक्षिण हब

* खेड (राजगुरूनगर) येथे कम्युटर टाऊन (निवासी, व्यावसायिक व इतर सर्व प्रकल्प)

* शिक्रापूर येथे लॉजिस्टिक आणि औद्योगिक हब

* उरूळी कांचन येथे ॲग्रो प्रोसेसिंग हब

* सासवड येथे  एअरोट्रोपोलीस (हवाईजहाज केंद्र) 

* खेड शिवापूर येथे ॲग्रो प्रोसेसिंग हब

* नसरापूर येथे हेरिटेज टुरिझम आणि शैक्षणिक केंद्र 

* रांजणगाव येथे इंटिग्रेटेड (एकत्रित) निवासी केंद्र 

* यवत येथे कम्युटर टाऊन (निवासी, व्यावसायिक व इतर सर्व प्रकल्प)

* केडगाव येथ कम्युटर टाऊन (निवासी, व्यावसायिक व इतर सर्व प्रकल्प)

----

प्रारूप आराखड्यांवर नोंदवा हरकती, सूचना

पीएमआरडीएने प्रारूप विकास आराखडा सोमवारी (दि. २) रोजी प्रसिद्ध केला आहे. कार्यक्षेत्रातील नागरिकांनी येत्या ३० दिवसांद आपल्या हरकती आणि सूचना नोंदवाव्यात, त्यासाठी pmr.dp.planning@gmail.com या मेल आयडीवर पाठवण्याचे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनी केले आहे.  

----

कोट

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र ६९१४.२६ चौ.कि.मी. असून हे क्षेत्र राज्यातील सर्वात मोठे आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे. मोठ्या प्रकल्पाबरोबर आम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये शेती, वन, वनीकरण, हिल टॉप हिल स्लोप, पर्यटन, ग्रीन बेल्ट वापर विभाग व रस्त्यांचे जाळे प्रस्तावित केले आहे. पुणे महापालिकेची हद्दवाढ केलेली असल्याने आम्ही फक्त २३ गावांचा विकास आराखडा तयार करून तो शासनाला सादर करणार आहोत.

- डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए

 

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीए