वीर धरणातून 23 हजार क्युसेक्सने विसर्ग

By Admin | Updated: August 5, 2014 23:35 IST2014-08-05T23:35:31+5:302014-08-05T23:35:31+5:30

पुरंदरमधील वीर धरणाचे आज मंगळवारी मध्यरात्नी 5 दरवाजे 4 फुटाने उघडून नीरा नदीपात्नात प्रतिसेकंद 23 हजार क्युसेक्सपेक्षा अधिक प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.

23,000 cusecs from Veer dam | वीर धरणातून 23 हजार क्युसेक्सने विसर्ग

वीर धरणातून 23 हजार क्युसेक्सने विसर्ग

नीरा: पुरंदरमधील वीर धरणाचे आज मंगळवारी मध्यरात्नी 5 दरवाजे 4 फुटाने उघडून नीरा नदीपात्नात प्रतिसेकंद 23 हजार क्युसेक्सपेक्षा अधिक प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. परिणामी आज दुस:या दिवशीदेखील नीरा नदीपात्नातील पूरस्थिती दुपारपर्यंत वाढली होती.  वीर धरण पाणलोट क्षेत्नात अल्पप्रमाणावर केवळ 25क् मि.मी. आजअखेर पाऊस झाला असला तरी वीर धरणामध्ये सध्या 1क्क् टक्के म्हणजे 9 हजार 835 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, नीरा नदीच्या पूरस्थितीमुळे नीरा नदीकाठच्या गावांना जलसंपदा आणि महसूल विभागाच्या प्रशासनाने  इशारा दिला आहे.  
आज सायंकाळी उशिरार्पयत नीरा-देवघर धरणामध्ये 85 टक्के तर भाटघर धरणामध्ये 78 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. नीरा-देवघर आणि गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्नात पावसाने काल जोर धरल्याने वीर धरणाच्या पाणीसाठय़ात कमालीची वाढ झाली. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्नी वीर धरणाचे 5 दरवाजे 4 फुटाने उघडून 23 हजार 585 क्युसेक्स इतक्या प्रमाणावर धरणातून नीरानदीत पाणी सोडण्यात आले. परिणामी आज दुपारपर्यंत नीरा नदीपात्नातील पुराचे पाणी वाढले होते. सकाळी दहा वाजता वीर धरणाच्या उघडलेल्या 5 दरवाजांपैकी 2 दरवाजे पुन्हा बंद करून सध्या 3 दरवाजांमधून 15 हजार 161 क्युसेक्स 
इतक्या प्रमाणात नीरा नदीत सायंकाळी उशिरापर्यंत पाणी सोडण्यात येत होते.   
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्नात नीरा-देवघर आणि गुंजवणी 
धरणाच्या पाणलोट क्षेत्नातून अधिक प्रमाणावर कालपासून पावसाचे 
पाणी येऊ लागले आहे. नीरा - देवघर धरणाच्या परिसरात 11क् मि. मी. तर गुंजवणी परिसरात 125 मि.मी. इतक्या प्रमाणात पाऊस झाला. 
 
नीरा नदीला आलेल्या पुरामुळे पुणो आणि सातारा जिल्ह्यातील सीमेवरील पाडेगाव येथील दत्त घाटावरील मंदिराला पाण्याने वेढा दिला होता तर सर्दच्या ओढय़ाला पुराचे पाणी लागल्याने या ओढय़ावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती. दरम्यान वीर धरणातून नीरा नदीपात्नात पाणी सोडल्याने नीरा नदीला पुरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या नीरा शहर आणि पिंपरेखुर्द या गावांना महसूल विभागाच्या वतीने पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील आणि जलसंपदा खात्याच्या वतीने सहाय्यक अभियंता दिगंबर डुबल यांनी सतकर्तेचा इशारा दिला आहे. 
 
कुकडीत 67.68 टक्के पाणीसाठा
नारायणगाव : कुकडी प्रकल्पातील पाच धरणांमध्ये आज (मंगळवारी) दुपारी 2 वाजेर्पयत येडगाव धरण 94.23 टक्के, तर वडज धरण 93.31 टक्के भरले आह़े  या दोन्ही धरणांमधून अतिरिक्त अडीच टीएमसी पावसाचे पाणी नदी व कालव्याद्वारे सोडण्यात येत आह़े  उपयुक्त पाणीसाठय़ात चांगली वाढ झाली असून, सर्व धरणांमध्ये सरासरी 67.68 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आह़े, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ 1  चे कार्यकारी अभियंता शिवाजीराव बोलभट यांनी दिली़
पाचही धरणांमध्ये 2क्666 द.ल.घ.फू उपयुक्त पाणीसाठी उपलब्ध झाला आहे. गतवर्षी या दिवसाअखेर 23491 द.ल.घ.फू (76.93 टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. 
येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रमध्ये 26.3क् द.ल.घ.फू (93.23 टक्के) पाणीसाठा उपलब्ध आह़े   यातून अतिरिक्त पावसाचे पाणी कुकडी कालवा व कुकडी नदीत सोडण्यात येत आहे. कुकडी नदीत 2 हजार क्युसेक्स, तर कुकडी कालव्यात 13क्क् क्युसेक्सने  पाणी सोडण्यात येत आहे.  दिवसभरात 21 मिलिमीटर पाऊस झाला आह़े   1 जून पासून आजअखेर 421 मिलिमीटर पाऊस झाला. वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रमध्ये 1क्91 द.ल.घ.फू (93.31 टक्के) पाणीसाठा झाला आह़े  अतिरिक्त पावसाचे पाणी मीना नदीत 193क् क्युसेक्स वेगाने, तर मीना कालव्यात 419 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. येथे दिवसभरात 26 मि.मी पाऊस झाला आह़े  1 जूनपासून आजअखेर 382 मि.मी पाऊस धरणक्षेत्रत झालेला आह़े 
 
माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रमध्ये 4432 द.ल.घ.फू (43.55 टक्के) पाणीसाठा  असून, दिवसभरात 29 मि.मी.पाऊस झाला. 1 जूनपासून आजअखेर 636 मि.मी. पाऊस झाला आह़े  पिंपळगाव जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रमध्ये 213क् द.ल.घ.फू पाणीसाठा उपलब्ध झाला. धरणात 54.67 टक्के पाणीसाठा आह़े  
आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रमध्ये 1क्383  द.ल.घ.फू (83.1क् टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दिवसभरात 36  मि.मी. पाऊस  झाला आह़े  1 जूनपासून आजअखेर 559  मि.मी.पाऊस  झाला. या धरणातून अतिरिक्त पावसाचे पाणी नदीत 6क्क् क्युसेक्सने सोडण्यात येत आह़े

 

Web Title: 23,000 cusecs from Veer dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.