शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २३ गावांना दरड कोसळ्ण्याचा धोका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 20:13 IST

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मार्फत पाहणी करण्यात आली. त्यात २३ गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला. 

ठळक मुद्देपावसाळ्याआधी कामे उरण्याचे आव्हान : दरडप्रवण गावांतील कामांसाठी ३ कोटी ६५ लाखांचा निधीया गावांसाठी ३ कोटी ६५ लाख २३ हजार रुपयांचा निधी मंजूर

पुणे : जिल्ह्यातील वेल्हे, मुळशी, भोर, जुन्नर, आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील २३ गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. या गावांसाठी ३ कोटी ६५ लाख २३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातील १६ गावांतील कामांना सुरुवात झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ऐन पावसाळ््यात ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. माळीण येथे झालेल्या दुर्घटनेनंतर आशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील डोंगर उतारावर वसलेली घरे, वाड्या, गावांच्या प्राथमिक पाहणीत अशी ९५ ठिकाणे धोकायदायक असल्याचे समोर आले होते. या ठिकाणांची भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मार्फत पाहणी करण्यात आली. त्यात २३ गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला. या गावांमध्ये सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करण्यात आली होती. त्यांनी सुचविलेल्या शिफारसीनुसार या गावांतील कामांसाठी ३ कोटी ६५ लाख २३ हजार रुपयांचा निधी ७ मार्च २०१८ रोजी मंजुर करण्यात आला. यातील १६ गावांमधे कामास सुरुवात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर, भोर तालुक्यातील जांभूळवाडी, पांगारी सोनारवाडी, डेहेन, धानवली, मुळशी तालुक्यातील घुटके आणि वेल्हे तालुक्यातील आंबवणे ही गावे वन क्षेत्रात असल्याने येथील कामे वन विभागाच्या माध्यमातून केली जातील. तसेच या २३ गावांतील जुन्नर तालुक्यातील निमगिरी तळमाची, मावळ तालुक्यातील भुशी आणि वेल्हा तालुक्यातील धोल येथे दरड कोसळण्याचा धोका नसल्याचा अभिप्राय सार्वजनिक बांधकाम विभागाने उत्तर आणि दक्षिण विभागाने दिला आहे. परिणामी येथील कामांसाठी निधी देण्यात आलेला नाही...................दरडप्रवण गावे : फुलवडे अंतर्गत भगतवाडी, माळीण अंतर्गत परसवाडी, आसाणे, जांभोरी अंतर्गत काळेवाडी, बेंडारवाडी (सर्व आंबेगाव तालुका), लोहगड, ताजे, बोरज, तुंग-भैरवनाथ मंदिर परिसर, माळवाडी, माऊ गबाळे वस्ती, माऊ मोरमाची वाडी, भुशी (सर्व मावळ), मोरगिरी पदर वस्ती, भोमाळे (खेड), जांभूळवाडी (कोर्ले), पांगारी सोनारवाडी, डेहेन, धानवली खालची (सर्व भोर), घुटके (मुळशी), आंबवणे, घोल (वेल्हा), निमगिरी अंतर्गत तळमाची (जुन्नर). 

टॅग्स :PuneपुणेMalingaonमाळीणगावRainपाऊस